यवतमाळ शैक्षणिक

वाटखेड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी: धीरज शेरकर

वाटखेड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत वाटखेड. येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत प्रजासत्ताकदिना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 6 वाजता करण्यात आले होते या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ अगलधरे उद्घाटक प्रकाश तडसे प्रमुख पाहुणे राहुल पारधी महेंद्र अगलधरे शाळा समिती सदस्य विजय हागरे ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच ताई बाई वाघमारे व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत.गोंडी नृत्य .शेतकरी गीत. कोळी गीत .लावणी .आदिवासी गीत .ढेमसा. इत्यादी सर्व नृत्यगीताने प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य सर्व पालक व समस्थ ग्रामवसियानी सहकार्य केले विशेषकार्य शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार भोयर शिक्षक धनंजय पत्रे शिक्षणसेवक प्रगती शेरकर पपिता मेटकर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडप डेकोरेशन संतोष शेरकर डी जे.वादक राहुल वाघमारे यांनी सहकार्य केले

Copyright ©