यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद शाळेत पुस्तकं वाटप

जिल्हा परिषद शाळेत पुस्तकं वाटप

भांब (राजा )येथील जिल्हा परिषद शाळेत संस्कार पुस्तकाचे वाटप करण्यात आले आज विद्यार्थांन मध्ये वाचन बंद होत आहे प्रत्येक विद्यार्थी केवळ मोबाईल च्या आहारी गेल्याने वाचनाची गोडी कमी झाल्याने बुद्धिहीन होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे त्या मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व प्रत्येकानी पुस्तकाचे वाचन करावे या अनुषंगाने भांबराजा येथील जिल्हा परिषद शाळेत पुस्तके वाटप करण्यात आले शाळा समितीचे अध्यक्ष दुर्योधन रामटेके यांच्या माध्यमातून स्व. पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ च्या वतीने जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके तालुका अध्यक्ष नीलेश पवार प्रमुख अनिल डीवरे यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास येथील मुख्याध्यापक संतोष मरगडे कु. अरुणा मेश्राम कु. मंजुषा नहाते, कु. सुचित्रा माळवी, कु. प्रियंका नरेंद्र खसाळे व व्यवस्थापन समितीचे सौ मंगला बाबरे, पंकज धांदे ,लक्ष्मण देवरे, संतोष राठोड, किरण भगत, वैशाली सोनटक्के, जया करपते, सुरेश देवरे, सुरेश बोंद्रे, कु.अरुणा मेश्राम, यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वर्ग दुसरा वर्ग तिसरा व वर्ग चौथा अशा एकूण 25 ते 30 विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले

Copyright ©