यवतमाळ सामाजिक

रस्ता सुरक्षा सप्ताह निबंध स्पर्धेत चार विद्यार्थ्यानी मारली बाजी

प्रतिनिधी प्रवीण राठोड

रस्ता सुरक्षा सप्ताह निबंध स्पर्धेत चार विद्यार्थ्यानी मारली बाजी

अकोला बाजार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी

अकोला बाजार :- यवतमाळ पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड,पोलिस उपअधीक्षक पीयूष जगताप आणि विभागीय पोलीस अधिकारी गुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह 20 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत अभियान राबविण्यात आले. या अभियानात अंतर्गत वडगाव जंगल पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजीव खंदारे यांनी अकोला बाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत रस्ता सुरक्षा यावर विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना जागृत करण्यासाठी वर्ग 10 वि च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली.

या स्पर्धेत अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थ्यानी बाजी मारली. याचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन,सत्कार करून पारितोषिक देण्यात आले. यात प्रथम क्रमांक अवंतिका बाळू चव्हाण, द्वितीय क्रमांक वैष्णवी सुभाष पवार तर तृतीय क्रमांक प्रथमेश धर्मेंद्र कडू, चतुर्थ क्रमांक प्रज्वल ज्ञानेश्वर सपाट यांनी पटकाविले. यावेळी उपस्थित ग्रा.पं.अकोला बाजार सरपंच योगेश राजूरकर,उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण मोगरे, वडगाव(जं) सपोनि संजीव खंदारे, पीएसआय डोंगरे,एएसआय भाऊराव बोकडे, ग्रा.पं.सर्व सदस्य गण,शाळा समिती सदस्य गण,तलाठी,ग्रामविकास अधिकारी,पत्रकार बांधव,गावातील प्रतिष्ठित नागरिक,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.

_______________________

*अकोला बाजार येथे प्रजासत्ताक दिन साजरा*

 

अकोला बाजार : अकोला बाजार ग्राम पंचायत येथे 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.या प्रसंगी ग्राम पंचायतीला सजावट करण्यात आले. तर ग्राम पंचायत येथील आझादी का अमृत महोत्सव निमित्त स्थापन केलेल्या शीला फलकाचे पूजन सरपंच योगेश राजूरकर,उपसरपंच प्रविण मोगरे यांच्या हस्ते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजन करून पुष्पहार अर्पण ग्रा.प. सदस्य गण, ग्राम स्तरीय अधिकारी, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक वृंद, महिलां यांच्या हस्ते करण्यात आला.सरपंच योगेश राजूरकर यांनी ध्वज पूजन करून ध्वजारोहण केले.

या कार्यक्रमाला गावातील मोठ्या प्रमाणात नागरिकांसह,ग्राम पंचायत सदस्य गण,ग्राम स्तरीय अधिकारी,कर्मचारी, जिल्हा परिषद हायस्कूल मधील शिक्षक व विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच लक्ष्मीबाई कावळे महाविद्यालय मधील विद्यार्थी, केके ब्रिंग डेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील लहान चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी सुनील भाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन कोयरे यांनी केले.

Copyright ©