यवतमाळ सामाजिक

सदगुरु भगवंत माऊलीचा पुण्यस्मरण सोहळा

सदगुरु भगवंत माऊलीचा पुण्यस्मरण सोहळा

श्री सदुरूभगवंत आध्यात्म अनुसंधान शक्तीपिठ यांच्या वतीने दर महिण्या च्या पहिल्या रविवारी शक्तीपिठाचार्य साक्षी भगवंत महाराज यांच्या वाणीतुन सत्संगाचे आयोजन केल्या जाते. या सत्संगाच्या माध्यमातून अनेकांनी व्यसनमुक्ती ची कास धरत आपल्या व्ससनाचा त्याग केला आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरचेही भक्तगण या सत्संगाला मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

सदगुरु भगवंत माऊलीचा ३५ वा पुण्यस्मरण सोहळा येत्या १८ व १९ जानेवारीला भांब राजा येथे अखंड दोन दिवस विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे .
कलश स्थापना करुन दि १८ ला कार्यक्रमाची सुरवात केली जाणार आहे. हरिपाठ, भारुड, सामुदायिक प्रार्थना, ध्यानयोग, तसेच साक्षी भगवंत विनोद महाराज आक्कावार लिखीत आत्मचैतन्य भजनमाला या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा या प्रसंगी केले जाणार आहे. याच कार्यक्रमात सेवाधारी साधकांचा संस्थान च्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. आत्मजागृती संगित प्रवचन आणी अखंड भजन जागृती चालणार आहे.
दि १९ ला सकाळी सामुदायिक ध्यानयोग साधना आणी श्री ची पालखी, पादुका व समाधी पुजनाने सुरु होईल. भांब नगरीतुन सगुरु भगवंत माऊली पादुका पालखी शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत अनेक गावातील
भजनी मंडळ, महिला
मंडळ, यात सहभागी होणार आहेत.
शक्तीपिठाचार्य श्री सदगुरु साक्षी भगवंत
माऊली यांचे गोपालकाला संजिवन
नाम संकीर्तन होणार आहे. या वेळी
भगवंत भुषण वाघ गुरुजी, भागवताचार्य
ह. भ. प. विष्णु महाराज ढगे.
बाबुलाल महाराज, दत्तात्रय मार्कड महाराज, उपस्थित राहणार आहेत. महाप्रसादाच काकार्यक्रमाचम सांगता होणा आहे. भभगवंत माऊली च्या सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने पुण्यस्मरण सोहळ्याला उपस्थित राहावे अशे आवाहन श्री सदुरूभगवंत आध्यात्म अनुसंधान शक्तीपिठ संस्थान भांब चे अध्यक्ष सुदाम बोन्द्रे यांनी केले आहे.

Copyright ©