यवतमाळ सामाजिक

एम एम २९ हेल्पिंग हँडस राळेगाव टीम चा सत्कार

एम एम २९ हेल्पिंग हँडस राळेगाव टीम चा सत्कार

मागील १० वर्षा पासून राळेगाव येथे वन्यजीव क्षेत्रा मध्ये मुक्या प्राण्यांना वाचवुन त्यांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगला मध्ये सोडून जीवदान देण्याचे मोलाच कार्य एम एच २९ हेल्पिंग हँडस वाईल्ड ऍडव्हेंचर अँड नेचर क्लब राळेगाव टीम करत आहे. त्यांनी आज पर्यंत ५००० च्या वर विषारी आणी बिनविषारी साप तसेच जखमी रोही,घुबड,बंदर यांचे वर उपचार करून त्यांना वनविभाग च्या स्वाधीन केले आहे तसचे दरवर्षी दिवाळी निम्मित अति दुर्गम आणी गरजू भाग असलेल्या मेळघाट येशील नवलगाव येथे गरजू लोकांना वस्त्र आणी शालेय साहित्य वाटप हा उपक्रम ही टीम घेत असते त्याच्या याचं कामाचे कौतुक आणी प्रोत्साहन म्हणून दी १४/०१/२४ ला यवतमाळ येथील विश्रामग्रुह येथे एका छोटे खानी कार्यक्रम घेऊन संस्थेचे अध्यक्ष संदीप लोहकरे उपाध्यक्ष अभिजित ससनकर,आदेश आडे,गौरव खामणकर,विजय काकडे, तेजस्विनी मेश्राम,शुभम येडस्कर यांना अवधूतवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षण श्री ज्ञानेश्वर देवकते साहेब तसेच एम एच २९ हेल्पिंग हँडस टीम यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष श्री निलेश मेश्राम उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. सोबतच यवतमाळ हेल्पिंग हँडस ग्रुप चे पवन आंबटकर,पायल लोहकरे, टीना मेश्राम, धनश्री गोरे, त्रिशुला छापरिया, आचल नगमोते यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता मोहन मूर्खे ( माहूर) प्रिन्स जाधव ( महागाव) भूषण राऊत (पुसद)अजित गजभिये (यवतमाळ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम चे आभार प्रदर्शन टीम चे राळेगाव तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मार्गदर्शक संदीप लोहकरे यांनी केले.

Copyright ©