यवतमाळ सामाजिक

मुक्या जनावरान साठी शेल्टर उपलब्ध करून द्या मुख्याधिकाऱ्यांना मागणी

मुक्या जनावरान साठी शेल्टर उपलब्ध करून द्या मुख्याधिकाऱ्यांना मागणी

आज दिनांक १६/०१/२०२४ युनिटी फॉउंडेशन यवतमाळ तर्फे न प मुख्याधिकारी दादाराव डोलाकार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मुक्या प्राण्यांसाठी शेल्टर उपलब्ध करून द्यावे नगरपरिषद च्या शाळा बंद पडल्या आहे त्या शेल्टर साठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी युनिटी फाउंडेशन तर्फे करण्यात आली ही मागणी ऍड सौ क्रांती धोटे राऊत प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जिल्हा नियोजन समिती यांच्या निदर्शनात आणून देताच त्याच्या नेततृत्वात नप मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात देण्यात आले यावेळी सौ.क्रांती धोटे लालजी राऊत ; शाम भाऊ भुसेवार विजय भाऊ बुंदेला ;अबोली देशमुख सोनाली मारोळकर युनिटी फॉउंडेशन चे अध्यक्ष प्रतीक तराळकर, अमेय ठोंबरे आकाश सहारे , सुधीर साखरकर, प्रिया गिरी, रियल कक्कड हितेश जाधव उपस्थित होते

Copyright ©