यवतमाळ सामाजिक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि, अजित पवार यांना दुधाचा अभिषेक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि, अजित पवार यांना दुधाचा अभिषेक

शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन भाव वाढीसाठी शेतकरी पुत्र कुणाल जतकर व परिसरातील शेतकरी पुत्राकडून यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथे दुधाने अभिषेक. शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस भाव वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना सद्बुद्धी मिळो यासाठी शेतकरी पुत्र कुणाल जतकर आणि परिसरातील शेतकरी पुत्रांनी दुधाने अभिषेक केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार आपली सत्ता वाचवण्यासाठी तत्पर आहे आणि शेतकरी वाचवायला यांना वेळ नाहीं.आपण रोज बघतो आहे शेतकरी आत्महत्या होत आहे. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.अति पावसामुळे शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन चे उत्पन्न कमी झाले,आता सरकार भाव देत नाही आहे.कापसाला 12 हजार आणि सोयाबीन ला 7 हजार द्यावा आणि शेतकऱ्यांच सरसकट कर्ज माफी द्यावी यासाठी शेतकरी पुत्र कुणाल जतकर आणि परिसरातील शेतकरी पुत्रांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांना सद्बुद्धी यावी यासाठी दुधाने अभिषेक यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथे केला… यावेळी नइम पठाण, विठ्ठल देडे, परेश राऊत, विष्णू आडे,विक्की शिवणकर, अक्षय गाडेकर, संदीप अतकर ,हेमंत अवझाडे, दिलिप जाधव,सुमित निकडे, भगवान गाडेकर,विठ्ठल मेश्राम, अक्षय डहाके,अक्षय जोगे,दुर्गेश भिवनकर,विजय आत्राम,अंकुश भराडे,वैभव काळे, सुनील देडे,राजू जतकर,गजानन देडे,आरिफ कुरेशी,नितीन राठोड,अमोल राठोड उपस्थित होते

Copyright ©