यवतमाळ सामाजिक

नवीन वाहतूक कायदा रद्द कराव्या मागणी करिता सावळी सदोबा येथे रस्ता रोको आंदोलन

नवीन वाहतूक कायदा रद्द कराव्या मागणी करिता सावळी सदोबा येथे रस्ता रोको आंदोलन

सावळी सदोबा:- पारवा पोलीस टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा येथील वसंतराव वसंतराव नाईक चौकात एकता वाहतूक संघटनेच्या वतीने आज सकाळी ९ वाजता पासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते,केंद्र सरकारकडून वाहतुकीचा नवीन कायदा लागु करण्यात आला तो रद्द करावा या मागणी करिता आंदोलन करण्यात आले, हा कायदा ड्रायव्हर संघटनेला मान्य नसल्याने हा तत्काळ रद्द करावा या कायद्याने ड्रायव्हर पूर्णपणे उध्वस्त होईल ड्रायव्हरचा कोणी वाली राहणार नाही अशा अवस्थेतला हा कायदा ड्रायव्हरला यशोधडीला लावणारा हा कायदा असल्याने आम्ही या कायद्याचा विरोध करतो असे म्हणत वाहतूक संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले मेन चौकात चक्काजाम झाल्या मुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, त्यानंतर पारवा ठानेदार यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन शासन दरबारी पोहचवु अशे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले, यावेळी सावळी सर्कलमधील समस्त ड्रायव्हर चालक-मालक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता यावेळी संदीप राठोड,प्रणय बोंबले, हरीश खरात, युसुफ पठाण,अंकुश पवार,जिवन चव्हाण,मारुती गेडाम, बाबू सिंग चव्हाण,फारुक शेख,वसीम कुरेशी,रोहित तोव्हर, संतोष शिरपूरकर,मनोज जाधव,शेख शकील, दिलीप शिंदे व इतरही ड्रायव्हर चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©