यवतमाळ सामाजिक

मार्कंडा येथे गावठाण व वन विभागाच्या जागेवर अवैध बांधकाम

मार्कंडा येथे गावठाण व वन विभागाच्या जागेवर अवैध बांधकाम

कळंब तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मार्कंडा या गावातील जलालुद्दीन जानमोहम्मद गीलानी व त्यांच्या परिवारतील इतर सदस्यांनी मार्कंडा येथील गावठाण वनविभागाच्या जागेवर अवैध अतिक्रमण करून कंपाऊंडचे अवैध बांधकाम केल्याची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य वनरक्षक अधिकारी यवतमाळ व गट ग्रामपंचायत मार्कंडा यांना तीन दिवसापासून तक्रार देऊन सुद्धा अजून पर्यंत याबाबत कोणतीही चौकशी का झाली नाही याकडे संपूर्ण गावातील नागरिक व तक्रार करते रवींद्र सुधाकर चिंचोळकर यांचे लक्ष लागले आहे या गावांमध्ये आत्तापर्यंत सुद्धा अनेक अतिक्रमण बाकी बांधकाम झालेले असावे अशी गावातील गरीब नागरिकांमध्ये चर्चा आहे व एखाद्या गरिबांना जर एखादी झोपडी जरी अतिक्रमणाखाली उभारली तर शासन ग्रामपंचायत त्वरित उठाव घेतात व गावातील प्रतिष्ठित व सदन व्यक्तीने गावातील उर्वरित खुल्या जागेवर जागेमध्ये ४४०× १५०एकूण ६६००० चौरस फूट जागेमध्ये ग्रामपंचायत ची परवानगी न घेता जबरदस्तीने दबाव टाकून गावातील गावठाण व वन विभागाच्या जागेवर गट नंबर 48 वनविभागाच्या जागेवरती जलालुद्दीन जानमोहम्मद गिलानी यांनी बांधकाम केल्यामुळे पलीकडे जाण्यासाठी गावातील शेतकरी व नागरिकांच्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे याच्यापलीकडे सदर पाणीपुरवठा गावठाणची वीर खालच्या भागांमध्ये असल्यामुळे लोकांचे पिण्याचे पानीं व वापरण्यात येणाऱ्या पाण्याची या बांधलेल्या कंपाउंडने येणे जाणे बंद झालेले आहे याबाबती ग्रामपंचायतने अजून पर्यंत कोणतीही चौकशी न केल्यामुळे ग्रामपंचायत तक्रार ला केराची टोपली तर दाखवलेली नाही ना अशी शंका लोकांमध्ये उपस्थित होत आहे,याची त्वरित गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून चौकशी करून व अतिक्रमण शासनाची जमीन शासन दरबारी जमा करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले आहे त्यामुळे चौकशी सुरू कधी करणार या कडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

Copyright ©