यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे विशाल धरणे आंदोलन

जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे विशाल धरणे आंदोलन

( मान्य केलेल्या मागण्याचा जिआर निघेपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जानार नाही-कॉ.दिवाकर नागपुरे)
……………………………………..
यवतमाळ :- गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा जीआर काढल्याशिवाय 12/1/2024 पासून सुरू केलेला बेमुदत राज्यव्यापी संप मागे घेतला जानार नाही असे आयटकचे कॉ.दिवाकर नागपुरे यांनी जाहीर केले आहे आजच्या 12 जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर आयोजित आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनात बोलताना त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद समोर आशा वर्कर गटप्रवर्तक महिलांनी सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत हल्लाबोल केला त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन पाठविण्यात आले. 29 डिसेंबर पासूनच सर्व ऑनलाईन कामावर आशा गटप्रवर्तक महिलांनी बहिष्कार घातलेला आहे.परंतू शासनाने अद्याप जिआर काढला नसल्यामुळे
महाराष्ट्रात 12 जानेवारी पासून आयटकसह कृती समितीने बेमुदत संपाची हाक दिली असल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना आरोग्याच्या कोणत्याही कामाची सक्ती अधिकाऱ्यानीं करता कामा नये. अन्यथा त्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.
यापुर्वी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केलेला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुर्तता
केली नाही त्या घटनेस आज दोन महिने झाले आहेत. तरीसुद्धा जिआर अद्याप काढला नाही. महाराष्ट्र शासनाने जिआर काढला नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी करावी जोपर्यंत शासन जिआर काढत नाही तोपर्यंत कोणतेही आरोग्याची कामे करू नयेत असे आवाहन कॉ.दिवाकर नागपुरे यांनी यावेळी केले.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ.विजय ठाकरे कॉ.दिवाकर नागपुरे, वंदना बोंडे, आशा बडेराव, रेखा मुधाने, सुहासिनी भगत, सुनीता सोनटक्के,विजया आत्राम, मालाताई इंगोले , सुनंदा कांबळे , अर्चना तोंडरे ,रंजना सोनोने , रंजना राउत , छाया खडककर , माया सातपुते, मंगला रांखुडे, हर्षमाला पांडे ,
निता सोयाम ,शीतल येसेकार ,सारीका येरमे , मंगला शेळमाके , योगीता करमणकर , लक्ष्मी बोडुवार , दीपमाला ठाकरे, सीमा लिंगणवार, सुजाता पुनेकर , वर्षा कुळमेथे, रेखाताई होले , किरण कांबळे, उज्वला पाझारे, ममता क्षीरसागर , सिमा पाटील, विजया तायडे, गंगाबाई घुमे , शैला दातार, समशाद पठाण , योगीता हेमने , शैला दातार, ज्योत्स्ना दुधे, माया इंगोले, राखी पवार, गीता जाध, शीलाताई भगत , छाया राठोड, चंचल केदार, दैवमाला खंदारे, रिना कौडुलवार , शोभा राहुल वाड, कांता खरवडे , संगीता आडे , अंजना कुरूकुटे , विजया शेखावत , शील्पा राठोड, किरण राठोड, शुंभागी सुकळकर, शालीनी ढोके, सुजाता खाडे, वर्षा वानखडे, बबिता चिंचोळे, गुंफाताई गेडाम,छबुताई इंगोले, वंदना लोणारे ,अजंना वानखडे, कविता जाधव, साधना भगत , विद्या लेंडे , छाया पाटील, सुनीता धोटे , कल्पना कांबळे, रंजना
वानखडे, सुनीता कुंभारे , ज्योती गुडेकार , वैशाली खीरटकर , लताबाई डाखोरे, सुधा मेश्राम, सुनीता, चव्हाण, वंदना वाळुकर, प्रतिभा ढोकने ,सनिता जयस्वाल यांनी केले
यावेळी शेकडो आशा व गटप्रवर्तक महीला उपस्थित होत्या

Copyright ©