यवतमाळ राजकीय

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त – यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील जि.प शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे वाटपाला प्रारंभ

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त – यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील जि.प शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे वाटपाला प्रारंभ

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी मी सदैव कटिबध्द – संतोष ढवळे (जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब. ठाकरे )- साधला विद्यार्थीशी संवाद

बोरी अरब यवतमाळ – वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्त
संतोष ढवळे जिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे)यांच्या हस्ते यवतमाळ मतदार संघातील. शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे वाटप करण्यात आले .
केंद्रनिहाय जिल्हा परिषद शाळा -तथा खाजगी शाळा यांचाही समावेश करण्यात आला. नोटबुक वाटप कार्यक्रम
सोमवार दि.9-01-2024रोजी पासून प्रारंभ झाला यात चानी जि प केंद्र अंतर्गत कामठवाडा, चाणी , चिकणी आमशेत उमट्टा मोजर ईजारा, वडगाव गाढवे, करमाळा, सावंगी, सावळा या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बुक्स वाटप करण्यात आले. यामध्ये संतोष ढवळे यांनी गोर-गरीब मध्यमवर्गीय, विद्यार्थ्यांसाठी हितगुज करताना एखाद्या उत्कृष्ट शिक्षकाप्रमाणे.. वर्ग एक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे यासंबंधी विचार मांडताना ते म्हणाले ,”मी सदैव विद्यार्थ्यांच्या करिता तथा रुग्णांच्या रुग्णसेविकरीता हे आयुष्यातील एक व्रत म्हणून माझं आयुष्यच वाहून घेतलय आणि..यातून. रुग्ण बरे होऊन घरी आनंदात जेव्हा जातात….आणि कळत न कळत कधी फोन तर कधी गावात जाताना…त्यांच्या तोंडून शब्द हुंकार निघतो…जो आनंद होतो..तेच आयुष्याच्या वाटेवरती मिळणारा जिव्हाळा परत परत आणखी सुंदर कार्य करण्यास मला प्रवृत्त करून कायम ऊर्जा देत असतात.. असे म्हणताच.. सर्व विद्यार्थ्यांनी कडकडून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले आणि भाऊ कुठे जरी दिसले तर आवर्जून जय महाराष्ट्र भाऊ असे चिमुकली पाखरे सुद्धा त्यांचा कार्यकर्ता सुद्धा दिसला तर आवर्जून या पद्धतीने घोषणा देऊन हे प्रेम जिव्हाळा निर्माण करतात….म्हणतात ना…
मंजीले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है पंखों से कुछ भी हासिल नहीं होता।
मगर हौसले से उड़ान हुआ करती है। अर्थातच आपल्याला यश संपादन करायचे असेल तर आपण दृढ संकल्प करायला हवा असे यावेळी संतोष ढवळे यांनी सांगितले..
याप्रमाणे संपूर्ण लाडखेड कामठवाडा ,बोरी सर्कल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना.. उत्कृष्ट शैलीत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातील चर्चेमध्ये भाग घेत एकमेकांची मने जिंकली आणि आम्ही सुद्धा उत्कृष्ट देशाचे नागरिक म्हणून कोणी डॉक्टर इंजिनिअर अधिकारी जरूर बनवून अशी अभिवचन देत सर्वांची मने जिंकत.. ख-या अर्थाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त.. अभिवादन करत.. या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
बोरी अरब जि. प. केंद्र अंतर्गत नोटबुक्सचे वाटपामध्ये
1) बोरी अरब – जि.प शाळा राजीव नगर, उ.प्रा.बेशीक शाळा, जि.प.कन्या शाळा,जि.प.उर्दु शाळा
बाबा अरब साहब उर्दू हायस्कूल,
खटेश्वर कन्या विद्यालय, टागोर विद्या मंदीर आदी सर्कल मधील शाळेचा समावेश होता.
या कार्यक्रमाला संतोष ढवळे (जिल्हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे) यांचा हस्ते वाटप करण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी सागर ताई पुरी ( मा. पंचायत समिती सभापती तथा शिवसेना जिल्हा समन्वयक यवतमाळ ) ह्या होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक- आशिष सावंकार यांनी केले.. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी*
*शिवसेना उप तालुकाप्रमुख रवी गझलवार ,सौ ज्ञानेश्वरीताई कळंबे( ग्रा.पं.सदस्या),
शिवसेना,तालुका समन्व्यक- पुंडलीक भाऊ भुरे,,योगेश ईलमे ( शहरप्रमुख), शेषरावजी कळंबे ( मार्गदर्शक),राजेश गुप्ता (.य.वि.उ भा. सेल संघटक), प्रदीप मेश्राम-( शिवशक्ती भीमशक्ती सेना उपजिल्हा प्रमुख), एहरार शेख (उपशहरप्रमुख) कोंडेश्वरभाऊ खडगी ( मा सरपंच), श्रीधर भाऊ इंगळे, ( दुधगाव) जितेंद्रभाऊ दुधे,) पठाण काका,
शिवसेना विभाग प्रमुख देवानंद राठोड, ओंकार राऊत,रवि गायकवाड,संदिप महल्ले, जुनेद शेख,, अभिजित गायकवाड, सुभाष शेळके( सरपंच),देवानंद पारिसे( उपसरपंच) ,लक्ष्मण घुले,सुशील आखरे, .फिरोज पठाण, बजरंग तायडे,
युवासेना पदाधिकारी
युवासेना उपजिल्हा प्रमुख गिरीजानंद कळंबे, युवासेना तालुका प्रमुख विकास गझलवार,युवसेना तालुका समन्व्यक अतुल कोकाटे, युवासेना ता. सचिव अमोल राठोड,युवासेना उपतालुका प्रमुख- विवेक जाधव-,
गौरव पखाले ,
युवासेना विभाग प्रमुख विक्रम राठोड, निखिल डोमाळे,शुभम तायडे,विद्यार्थी सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ आदि मान्यवर उपस्थित होते..

Copyright ©