यवतमाळ राजकीय

नितीन मिर्झापूरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण चालक मालक संघटनेचा चक्काजाम वाहन चालविणाऱ्या चालकाचे बेशरमाचे झाडे देऊन केले स्वागत

नितीन मिर्झापूरे यांच्या नेतृत्वात
ग्रामीण चालक मालक संघटनेचा चक्काजाम
वाहन चालविणाऱ्या चालकाचे बेशरमाचे झाडे देऊन केले स्वागत

केंद्र शासनाने काळा कायदा बंद करणार नाही तो पर्यंत रस्त्यावर एकही वाहन चालणार नाही, असा निर्धार करून आज दुपारी 12 वाजता मंगरूळ का.येथे प्रहार संघटनेचे माजी नगरसेवक नितीन मिर्झापूरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडउन चक्का जाम आंदोलन केले यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या मधस्तीने आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले परंतु जो पर्यंत काळा कायदा माघे घेणार नाही तो पर्यंत स्टे रिंग बंद आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकांन कडून सांगण्यात आले, ज्या चालकाचे 7 लाखाचे घर नाही,तो हा दंड कुठून भरणार असा सवाल करण्यात येत आहे.
यवतमाळ ग्रामीण वाहन चालक मालक संघटना यांनी 9 जानेवारी च्या मध्य रात्री 12 वाजता पासून संपूर्ण वाहन बंद ठेवण्याचा निर्धार केला केंद्र शासनाने ‘हिट अँड रन ,’चुकीचा कायदा अमलात आणला , तो चालकान करिता एक मोठा शाप आहे, चालकास परिवाराचे पालन पोषण होत नाहीत इतका पगार त्यांना मिळतो तर पगार शिल्लक कुठून पडेल आणि अपघात झाल्यावर सात लाख कुठून द्यायचे,ज्या काही मालकांच्या गाडीची किंमतच चार ते पाच लाख रुपये असते याची सुद्धा जान सरकारला नसावी हि किती मोठी शोकांतिका आहे चालकास सजा झाली तर त्याच्या परिवारास कुणी आधार द्यायचा त्यांचे पालन पोषण मुलांचे शिक्षण कुणी करायचे असे शेकडो प्रस्न या कायद्याने उपस्थित केले आहे याची त्वरित दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र होईल असा इशारा नितीन मिर्झापूरे यांनी दिला या आंदोलनात प्रहार सघटनेंचे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ मिर्झापूरे,अक्षय साठे.सलीम शेक. गजानन नेवारे. सुनील चेके गजानन चन्ने. कुंदन नागदेवते खुशाल राठोड. प्रदीप राठोड. श्रवण डवले. अक्षय घुटके. विनोद खेडकर. विनय पाल.सचिन सोनवणे. बाळू राठोड. ऋषभ माहुरे,नीलेश शहारे व शेकडो चालक मालक सहभागी झाले होते.

Copyright ©