यवतमाळ राजकीय

आपच्या यवतमाळ तालुका अध्यक्ष पदी मोबीन शेख यांची नियुक्ती – आम आदमी पार्टी

आपच्या यवतमाळ तालुका अध्यक्ष पदी मोबीन शेख यांची नियुक्ती – आम आदमी पार्टी

महाराष्ट्रातील जनतेला अरविंद केजरीवाल मॉडेल अंतर्गत शिक्षा आरोग्य वीज पानी महिला करीता मोफत बस सेवा सारखे अनेक मूलभूत सुविधा देने करीता आम आदमी पार्टीच्या तर्फे महाराष्ट्र मध्ये निवडणूक लडून सत्ता स्थापित करने व सुशासन लागू करण्या करीता चळवळ आधीच सूरू केली आहेत. याच अनुषंगाने संघटन मजबुती करने करीता सामाजिक राजकीय महत्वकांक्षा असणारे व पार्टी संघटनला मजबुत करून देश सेवा करण्याच्या उद्देश ने काम करण्याकरिता उत्सुक नव्या नेतृत्वाला आपच्या वतीने नव्याने जिल्हा भर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहेत. तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती महाराष्ट्र सह प्रभारी अड. गोपाल ईटालीया, अड .राज्य संघटन सचिव मनीष मोडक व यवतमाळ जिल्हाध्यक्ष वसंतराव ढोके यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहेत. आम आदमी पक्ष व अरविंद केजरीवालजी च्या नेतृत्वात भारताला व महाराष्ट्र सोबतच यवतमाळ ला विकसित क्षेत्र बनवण्याच्या उद्देश नी पक्षाला जुडलेले मोबीन शेख यांची सामाजिक चळवळ व पक्षा करीता तळमळ पाहता दुसर्यांदा यवतमाळ तालुका अध्यक्ष पदी मोबीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. महाराष्ट्र मध्ये संघटन विस्तार करीता व आपची ध्येय – उद्देश व दिल्ली व पंजाब मध्ये आम आदमी पार्टी सरकारचे उत्कृष्ट काम व जनतेच्या महागाई बेरोजगारी शेतकरीच्या अशे अनेक प्रश्नांचा वाचा फोडण्याकरीता व महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पनाच्या मार्गला व भारत रत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या व शाहिद भगत सिंग व अनेक महापुरुष व देशातील बलिदान देनारे अनेक स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्वप्नांचा राज्य बनवण्याच्या आपचे प्रयत्नला महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्नाने यशस्वी स्वराज्य यात्रा व झाडू यात्रा याच वर्षी मराठवाडा व विदर्भ मध्ये काळण्यात आली होती.
महाराष्ट्रातील जनता सध्याचे स्थापित पक्षाला त्रस्त झालेली आहेत – धर्म जाती व तोड फोड भ्रष्टाचारच्या महागाई बेरोजगारी सारखे अनेक मुद्यांवर राजकारणला त्रस्त महाराष्टातील जनता अरविंद केजरीवालजीच्या नेतृत्व मध्ये आपला एक आशा की किरण -आप एक विकल्प – काम की राजनीती अशी भावनाने नक्कीच संधी देनार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहेत अशी माहिती आपचे जिल्हा मीडिया प्रमुख रवी भोंगाडे यांनी दिली.

Copyright ©