विद्यार्थ्यांनी जिवनात खेळाला विशेष महत्व द्या- प्रा अनंत पांडे
सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासाकरिता खेळाचे महत्वपूर्ण योगदान असते.विविध खेळ व क्रीडा प्रकाराद्वारे विद्यार्थ्यांना खेळाबद्दल विशेष रुची तसेच माहिती प्राप्त होते. त्याबरोबरच त्यांच्यामध्ये नेतृत्वगुणांचा विकास होऊन, क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत अशा स्पर्धेचे आवर्जून आयोजन करण्यात येते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म्हणून निवृत्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.अनंत पांडे,सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र हॉकी महासंघाच्या उपाध्यक्ष सौ. मनीषा आकरे, सुसंस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा, उपाध्यक्ष श्री.सुनीलजी गुगलीया, सचिव श्री. संजय कोचे, कोषाध्यक्ष श्री.मनोज लुणावत, सदस्य श्री.प्रवीण लुणावत,श्री.गणेशजी गुप्ता,श्री.राजेशजी गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे,घनशामजी गुप्ता, तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. बालाजी वाकोडे व इतर सन्माननीय सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून क्रीडा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले तसेच मान्यवरांचे पुष्पगुछ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यातआले. प्रास्ताविकाच्या माध्यमातून मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचे महत्व पटवून दिले व स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.तदनंतर शालेय प्रार्थना हम को ‘मन कि शक्ती देना……..’,श्लोक पठण व ध्यान द्वारे कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व मनोरा चे सुंदर सादरीकरण केले. पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी मास ड्रिल अशा अनोख्या शारीरिक कसरतीचे सुंदर सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांची, पालकांची व उपस्थितांची मने जिंकली. जवळपास आठवड्या पासून सुरवात करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारामध्ये क्रिकेट,कबड्डी,खो-खो,लंगडी अशा विविध सांघिक खेळाचा शाळेतील चारही गृहा साठी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये क्रिकेटच्या प्रकारात ब्लू हाऊस,कबड्डी व खो-खो प्रकारात ऐलो हाऊस,लंगडी प्रकारात ग्रीन हाऊस चे संघ अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यांमध्ये विरोधी संघावर मात करीत ‘सुसंस्कार चषकाचे’ मानकरी ठरले.तसेच नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत व बॉल बॅलन्स ,रिंग रेस,बनी होप,पोटॅटो रेस,बलून रेस,बुक बॅलन्स कॅलेकटिंग वॉटर,फ्रॉग जंप,सॅक रेस,लेमन स्पून,स्किपींग रोप,थ्री लेग,कॉक फाइट,बॅकवॉर्ड रनिंग,स्लो सायकलिंग अशा विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनोरंजन करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना धावण्याच्या व विविध खेळाच्या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या व पालक प्रतिनिधीच्या हस्ते सुवर्ण,रजत व कांस्य पदके तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करून उत्साह द्विगुणित करण्यात आला. त्याबरोबरच कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक व पालकांसाठी सुद्धा खेळाचे आयोजन करून, विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवान्वित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला आपल्या पाल्याना प्रोत्साहित करण्यासाठी पालकांची विशेष उपस्थिती लाभली.
शेवटी मार्गदर्शनपर भाषणांच्या माध्यमातून प्रा.अनंत पांडे म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यासासह जिवनात खेळाला सुद्धा महत्व द्या, तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट खेळाडू बनण्यासाठी लागणारी जिद्द,चिकाटी व मेहनतिचे महत्व पटवून दिले तसेच प्रमुख पाहुण्या सौ.मनिषा आकरे ह्यांनी आपल्या प्रेरणादायी विचाराद्वारे त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.अशाप्रकारे राष्ट्रगीताद्वारे क्रीडा दिवसाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यासाठी शाळेचे श्री.निलेश शेटे,श्री.विनोद जाधव, मोहित जयस्वाल,कला शिक्षक रोशन माहुरे व इतर सर्व शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ.दीपाली कैतिकवार,मेघा केवटे शालेय वार्षिक वृत्तांत वाचन अक्षता मारडकर तर आभार प्रदर्शन राखी नाहाते यांनी केले.
Add Comment