यवतमाळ सामाजिक

जरंग जत्रेत शास्त्रीय नृत्य, दहीहांडीचे कृष्ण लीलाचे आयोजन

जरंग जत्रेत शास्त्रीय नृत्य, दहीहांडीचे कृष्ण लीलाचे आयोजन

मौजा जरंग ता. घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे नागदेवता मंदिराची अनेक वर्षों पासून महाजत्रा भरते या वेळी व्हीसल ब्लॉअर तथा सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत डालूरामजी बोरेले, पांढरकवडा आणि विठ्ठल रामजी राउत, संजय शंकररावजी जाधव रा.जरंग यांच्या संयुक्त विद्यमानने प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना स्नेहा पंधरे हया श्री कृष्ण दही हांडी आणि शास्त्रीय नृत्यांगन सादर करणार आहे.
स्नेहा पंधरे या नागपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या उत्कृष्ट शिक्षिका असून त्या कथक व भरतनाट्यमच्या नृत्य शिक्षिका सुद्धा आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही आपल्या नृत्याची छाप सोडून त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली असून देशाचा नाव लौवकीक केला आहे.
या सिवाय गुजराती चॅनल वरती रियालिटी नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले आहे है विशेष
. त्यांच्या सोबत गायनासाठी यवतमाळचे संगीत शिक्षक सचिन वालगुंजे व तबल्याची साथ देण्याकरिता तबला वादक स्वामी सांभजवार राहणार आहे.
दि.१६ डिसेंबर २०२३ वेळ दुपारी २ वाजता अप्रतिम शास्त्रीय नृत्य आणि देखावे अश्या स्वरूपाची श्री कृष्ण दही हांडि रास लीला सादर होणार आहे. या वेळी महिला, नागरिक आणि रसिकांनी आवर्जून हजर रहावे असे आव्हान रजनीकांत बोरेले,पांढरकवडा.यांनी केले आहे तर महाप्रसाद व काला समिति चे अध्यक्ष, विठ्ठल राउत,जरंग,
संजय जाधव उपाध्यक्ष,जरंग,आणि जरंग येथील सर्व नागरिक यांनी केले परिश्रम घेत आहे

Copyright ©