यवतमाळ सामाजिक

अकोला बाजार केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुर्न :गठण संपन्न

अकोला बाजार प्रतिनिधी प्रविण राठोड 
अकोला बाजार केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुर्न :गठण संपन्न

अकोला बाजार  जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळा अकोला बाजार येथे शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे पुर्न:गठण करण्यात आले . यात पंडीत रामपुरे,सविता प्रविण नेवारे,प्रकाश पुंडलिक मोगरे, अलीमोद्दीन काझी, सौ स्वाती पवन वेट्टी,सोनाली गणेश नेवारे,प्रकाश शेंदरे,राजु वगारहांडे,रेश्मा सलीमखान पठाण,रेखा संतोष राजुरकर,अशोक बोटरे,इंद्रजीत नेवारे,गजानन मडावी व स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी म्हणून सुरेखाताई किसनराव ठाकरे शिक्षक प्रतिनिधी म्हणून अर्चना क्षिरसागर यांची निवड करण्यात आली . शाळा व्यवस्थापन समितीचे पुर्न:गठण प्रक्रिया अतिशय सलोख्याच्या वातावरणात पालकांच्या व शिक्षकांच्या सहयोगाने पार पडली.सचिव आणि मुख्याध्यापक राधेशाम चेले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Copyright ©