यवतमाळ सामाजिक

पाळीव जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना गवळी समजाचे निवेदन

पाळीव जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधिकारी यांना गवळी समजाचे निवेदन

आम्ही शेतकरी, व गवळी समाज आपणास विनंती करतो की वटबोरी परिसरात जवळपास पाच हजाराच्या वर दुधाळ जनावरे आहे आणि आमचा उदर निर्वाह दुधाच्या उत्पादना वर आहे सध्या या परिसरातील चारा संपला असून वनविभागा कडे आवश्यकते पेक्षा चारा जास्त आहे  २० हेक्टर क्षेत्रावर त्या पेक्षा जास्त चारा उपलब्ध आहे या बाबत वणपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांनी चारा देण्याचे ग्रामसभेत आश्वासन दिले परंतु आज ते टाळा टाळ करीत आहे हा चारा न मिळाल्यास जनावरांवर व पालकांवर उपास मारी ची वेळ येण्यास वेळ लागणार नाही करिता आपण याची सहानुभूती पूर्वक दखल घेऊन परिसरात असलेला चारा उपलब्ध करून देण्यात यावा करिता जिल्हा अधिकारी व उपवन संरक्षक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर जिल्हा अधिकारी यांनी त्वरित चारा उपलब्ध करून देण्या करिता उपवन संरक्षक अधिकारी यांचेशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.या वेळी रमेश झामरे, गुलाबराव बोपटे, अरुण येवले, राजू साठे ,हरिभाऊ चावरे, विजय चावरे, भगवान चावरे, अमोल चावरे, अनिल घाटोळ, मदन घाटोळ ,अविनाश येवले, सदानंद राठोड, आकाश झांमरे ,गोपाल भोंगाडे, सुरेश भड गरिबाजी धराडे, किशोर कालोकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते

Copyright ©