Breaking News यवतमाळ

कार आणि ॲक्टिव्ह अपघातात दोन्ही चालकाचा मृत्यू.

कार आणि ॲक्टिव्ह अपघातात दोन्ही चालकाचा मृत्यू.

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत किन्ही येथिल उडान पुलावर अपघात होऊन,कार चालक व दुचाकी स्वार दोघांचाही मृत्यू झाल्याने दोन्ही परिवारावर दुःखाचे जणू काही डोंगर कोसळले.!
सवी.असे की किन्ही जवळील असलेला ढाबा संचालक सागर सुरेश पाटील वय 39 रा यवतमाळ हे आपली कार व्यागणर एम एच 31/सी एम 3618 वरील चालक सागर पाटील तर यवतमाळ कडून बोथ बोढन येथे जातं असताना ॲक्टिव्हा होंडा क्र. एम एच 29/सी सी 1214 वरील चालक नरेंद्र वसंत तुरी वय 35 रा.बोथ बोढन यांच्या वाहनाची आमना सामने जबर जबर धडक झाली यात दोघांचाही मृत्यू झाला हि घटना किन्ही उडान पुलावर रात्री 11.30 वाजता घडली या घटनेने परिसरात हळ हळ वेक्त करण्यात येत आहे चुकीच्या दिशेने वाहन चालविणे अथवा प्रवास करणे किती धोका दायक आहे या घटनेवरून लक्षात येते बाय पास मार्ग गावापासून लांब दिल्याने वाहन धारक आपला वेळ व इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात आपला व दुसऱ्याचा बळी घेतात राज्य महामार्गावरील बाय पास, प्रवासी निवारे गावा पासुन खूप लांब दिल्या गेले आहे हे पुर्णतः चुकीचे नियोजन करण्यात आले आहे त्या मुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची सृंखला सुरूच आहे रस्ते झाले चांगले पण नियोजन चुकीचे झाल्याने अनेक निष्पाप लोकांचा जीवावर बेतत आहे याची शासनाने त्वरित दखल घेऊन गावाजवळून बायपास रस्ता देण्यात यावा अशी मागणी केल्या जात आहे या अपघात प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस तपास करीत आहे.

Copyright ©