यवतमाळ शैक्षणिक

काश्यपीने पटकावला शिवकालीन मर्दानी कला क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक

काश्यपीने पटकावला शिवकालीन मर्दानी कला क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक

यवतमाळ – जिल्ह्याची नुकतीच जील्हा स्तरीय शालेय स्पर्धा शिवकालीन मर्दानी कला (अश्टे- डू – मर्दानी आखाडा) क्रीडा स्पर्धा 2023-24 यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे दिनांक 8/ 12 ला घेण्यात आली होती, या स्पर्धेत यवतमाळ येथील उज्वल नगर मध्ये राहणारी, सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये 7 वर्गात शिक्षण असलेली “काश्यपी विनोद दोंदल” हिने शिवकला (लाठीकाठी) या खेळ प्रकारात गटात 14 वर्षा खालील, 35 किलो वजन आतील गटात प्रथम क्रमांक पटकावला,
काश्यपी याचे सम्पूर्ण श्रेय वडील विनोद दोंदल, आई कीर्ती दोंदल, प्रशिक्षक प्रितम सोनवणे, देत आहे त्याच बरोबर सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल चे संस्थापक मुख्याध्यापक दिनेश पवार , उपमुख्याध्यापक स्मिती देशमुख, वर्ग शिक्षिका निधी , क्रीडा शिक्षक प्रतीक खुजे, सागर रेकवार इत्यादी शिक्षक वृंद वेळोवेळी मार्गदर्शनात, काश्यपी सोबत शिवकालीन मर्दानी कलेचे अभ्यास घेणारे सर्व मुले-मुलीच्या सहकार्याने काश्यपीने मिळवलेल्या नाविन्यपूर्ण यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे ..

Copyright ©