Breaking News यवतमाळ

चक्क पोलीस स्टेशन परिसरातच पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण

चक्क पोलीस स्टेशन परिसरातच पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाण

पत्रकाराला मारहाण करणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी व पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करा
दिग्रसच्या पत्रकार बांधवांची निवेदनातून पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

तालुक्यातील पत्रकार धर्मराज गायकवाड यांनी नगर परिषद दिग्रस येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांच्या स्वच्छता मोहीमेची बातमी प्रकाशित केली. मात्र त्या बातमीमध्ये माझा व्हिडिओ का टाकला नाही, म्हणून शहरातील बबलू शेख नामक व्यक्तीने दोन दिवसापासून सतत शिवीगाळ, रस्त्यात अडवून जीवे मारण्याच्या धमक्या देणे सुरू होते. दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये प्लॉटिंगच्या वादातून दोन गटात पोलीस स्टेशन हद्दीत वाद सुरू होता. सदर बातमी संकलन करण्याकरिता पत्रकार धर्मराज गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता बबलू शेख याने पुन्हा त्यांच्यावर पोलीस स्टेशन हद्दीत जातीयवाचक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण करत होते. बाराभाई मोहल्यात तुला नेऊन मारतो, म्हणून कॉलर पकडून ओढत घेऊन जात होते. तेथे उपस्थित पत्रकारांनी धर्मराज गायकवाड यांना आरोपी बबलू शेख यांच्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींकडून वाचवले, असे गंभीर प्रकरणाची दिग्रस पोलीस स्टेशनला धर्मराज गायकवाड यांनी रीतसर तक्रार दिली. मात्र सदरील घटनेचे घटनास्थळ दिग्रस पोलीस स्टेशनचे आवार असताना रामदेव बाबा मंदिर, वाल्मिकी नगर हे स्थळ टाकले. त्यामुळे घटनास्थळ पोलीस ठाण्याचे आवार करून पत्रकार संरक्षण कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करावे, अशी मागणी दिग्रस येथील पत्रकारांनी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

विशेष म्हणजे धर्मराज गायकवाड हे अनुसूचित जात प्रवर्गातील व्यक्ती असून त्यांच्यावर आरोपी बबलू शेख याने महारग्या, तुझं मूकनायक न्युज चॅनल बंद करतो, तू पत्रकारिता बंद कर, तू दलाल आहेस, मोदीचा बिकावू मीडिया आहेस, अशी आणि अशा अनेक अर्वाच्य भाषेत अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, असे धर्मराज गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. मात्र तशी तक्रार न घेता दिग्रसच्या पोलीस निरीक्षक यांनी धर्मराज गायकवाड यांच्यावर अन्याय केला असून त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार आरोपी बबलू शेख यांचेवर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत तसेच पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करावे आणि घटनेतील घटनास्थळ पोलीस स्टेशन आवार टाकण्यात यावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असेही निवेदनात नमूद केले आहे.

सदर निवेदनावर पुरुषोत्तम कुडवे, लक्ष्मण टेकाळे, अजीम खान, हनुमान रामावत, अमीन कलरवाले, कपिल इंगोले, अफजल खान, जय राठोड, जुबेर खान, विलास निकम, अजित महिंद्रे, प्रफुल्ल व्यवहारे, सुरेश चिरडे, पीपी पप्पूवाले, सय्यद शोएब, सुनील हिरास, यशवंतराव सुर्वे, धर्मराज गायकवाड, आजीस शेख, साजिद पतलेवाले, मजहर खान, प्रशांत झोळ, सदानंद जाधव यांच्यासह अन्य पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Copyright ©