यवतमाळ सामाजिक

जिल्हा आरोग्य अधिकारी यांची हिवरी केंद्राला भेट प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चाव्हाटयावर

जिल्हा आरोग्य अधिकारी यांची हिवरी केंद्राला भेट
प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चाव्हाटयावर

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती पुढे आली या ठिकाणी अनेक कर्मचारी हजर राहत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला आहे, रुग्णालयात स्वच्छता नाही,अनेक ठिकाणी घाणीचे प्रकार दिसून आले.या वेळी संपूर्ण रुग्णालयाची तपासणी करण्यात आली.रुग्णालयात दुर्लक्ष आहे काही कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नसल्याचे समोर आले मनात येईल तेव्हा आरोग्य केंद्रात दाखल होतात या बाबत त्यांना विचारणा केली असता समाधान कारक उत्तर देत नाही,असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले हे केंद्र फक्त पगारा पुरते केंद्र झाले आहे या रुग्णालयात प्रसूती करणे बंद झाले आहे गरोदर महिलेस प्रसूती करिता यवतमाळ येथे घेऊन जावे लागते हे केंद्र कर्मचाऱ्यांचे की सर्व सामान्यांच्या हिताचे हा प्रस्न अनुत्तरीत आहे.गरोदर मातेस या केंद्राचा लाभच मिळत नाही हि स्थिती आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे समोर दिसून आली त्यांनी या बाबत चिंता वेक्त केली.तर अर्जुना येथील उपकेंद्र बंद स्थितीत आढळून आले,या बाबत खुलासा वैद्यकिय अधिकारी यांना मागण्यात आला,तर जे कर्मचारी वेळेवर कुणी हजर राहत नसल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले, या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एच. चव्हाण,डॉ.तन्वीर शेख,चालक दिपक वणवे यांनी हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली या वेळी डॉ. श्रध्दा पुजारी, डॉ.प्रवीण नैताम व इतर कर्मचारी उपस्थित होते

Copyright ©