यवतमाळ राजकीय

युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीत यवतमाळ जिल्हयातून दोघांना स्थान

युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीत यवतमाळ जिल्हयातून दोघांना स्थान

दामिनी संजय राठोड तसेच विशाल गणात्रा यांची निरीक्षक पदी नियुक्ती

शिवसेना पक्षाच्या युवासेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारीनी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये युवासेना युवती च्या विदर्भ निरीक्षक पदी दामिनी संजय राठोड यांची तसेच युवासेना पश्चिम विदर्भ निरीक्षक पदी युवासेनेचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख विशाल गणात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर यवतमाळ जिल्हयातील दोघांचा समावेश करण्यात आल्याने या निवडीचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.

शिवसेना मुख्यनेते माननीय श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या “युवासेनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी” जाहीर करण्यात आली आहे. युवासेनेचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख विशाल गणात्रा यांची युवासेना यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्षपदी यापुर्वीच निवड करण्यात आली आहे. आता त्यांना युवासेनेच्या पश्चिम विदर्भ निरीक्षक पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत दामिनी संजय राठोड हिने सुध्दा सामाजिक कार्यात उडी घेतली आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार त्यांनीही आपली मोर्चेबांधनी सुरु केली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी महत्वाची असून ती यशस्वीपणे पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. देशभरात लोकसभेच्या निवडणुका अवघ्या सहा महिण्याच्या आंत घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रात सुध्दा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पुर्वतयारी केली जात आहे. प्रामुख्याने विदर्भात युवासेनेचा विस्तार तसेच बांधनी करण्यासाठी विशाल गणात्रा, तसेच दामिनी राठोड यांचेवर जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे विदर्भातील युवासेनेत उत्साह संचारला असून या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.

पक्षबांधणीला प्राधान्य देणार

राज्यात लवकरच लोकसभा तसेच त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. यामध्ये तरुणांवर विशेष जबाबदारी देण्यात येत आहे. पक्षाने आमच्यावर दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हयाचे पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, संपर्क प्रमुख हरीहर लिंगनवार, पराग पिंगळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही युवासेनेच्या बांधनीचे प्रयत्न करणार असल्याचे दामिनी राठोड, विशाल गणात्रा यांनी सांगीतले.

Copyright ©