यवतमाळ सामाजिक

वंचित लाभार्थ्यांना घरकुल मिळवण्यासाठी कुणाल जतकर यांचे बेमुदत आमरण उपोषण

वंचित लाभार्थ्यांना घरकुल मिळवण्यासाठी कुणाल जतकर यांचे बेमुदत आमरण उपोषण

मंगरूळ-: येथून जवळच असलेल्या वाई आणि रुई या गावांमध्ये वंचित लाभार्थ्यासाठी घरकुल देण्यासाठी कुणाल जतकर यांचे बे मुद्दत अमरण उपोषण सुरू करण्यात आली आहे यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मंगरूळ बेलोरा वाई रुई येथील वंचित लाभार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा घरकुल मधील लाभ मिळाल्या नसल्यामुळे अनेकदा तक्रारी करून सुद्धा कुठलेही कारवाई किंवा घर कुल सुद्धा उपलब्ध करून दिले नाही शासनाने अनेकदा शासनाचे दार ठोठावून सुद्धा वंचित लाभार्थ्यांना कुठल्याच प्रकारची घरकुल लाभ देण्यात आला नाही यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये सुद्धा तसेच रमाई आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आणखीन सुद्धा घरकुल लाभ मिळाला नाही याविषयी जिल्हाधिकारी व तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद यांना तक्रारी करून सुद्धा व अनेकदा मोर्चे काढून सुद्धा वंचित लाभार्थ्यांना घरकुला पासून वंचित ठेवण्यात आले तेव्हा याविषयी जोपर्यंत यांना घरकुल उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण वाई येथे चालूच राहणार असे यावेळी कुणाल जतकर यांनी देशोन्नतीशी बोलताना आपले मत व्यक्त केले तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने मध्ये वाई मंगरूळ बेलोरा रुई या गावांमध्ये लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नाही जोपर्यंत घरकुल मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असा निर्धार यावेळी गावकऱ्यांनी दिला,,कुणाल जतकर,विजय इंगळे, कृष्णा वायकर, विठ्ठल मेश्राम, परेश राऊत, विष्णू आडे, दुर्गेश भिवनकर, विजय ढाले, अंकुश मेश्राम, राम काळे,प्रकाश काळे,संजय चंद्र, अविनाश काळे, सुमित निकडे,

Copyright ©