यवतमाळ सामाजिक

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने केंद्रिय उपसचिव पंचायत राज यांची ग्रामपंचायत तेंडोळी येथे भेट

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने केंद्रिय उपसचिव पंचायत राज यांची ग्रामपंचायत तेंडोळी येथे भेट

विविध योजनांचा आढावा व प्रत्यक्ष कामाची पाहणी

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असलेले नरेशकुमार, केंद्रिय उपसचिव, पंचायत राज यांनी आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेंडोळी येथे भेट दिली.

यावेळी उपसचिव नरेशकुमार यांचे समवेत यवतमाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल जगताप, पंचायत समिती आर्णीचे विस्तार अधिकारी मुरलीधर भगत, सरपंचा सौ सपनाताई राठोड, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, तलाठी ममता पवार, उपसरपंच भगवान निकुरे, सदस्य परशराम राठोड, प्रल्हाद राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी केंद्रिय उपसचिव यांनी 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग संदर्भाने जमा-खर्चाचा व करण्यात आलेल्या बंधीत-अबंधीत कामाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजना या केंद्रिय योजनांसोबतच उमेद अभियान व राज्य शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. व लाभार्थ्याशी चर्चा केली.

त्यानंतर मिनी अंगणवाडीला व मिनी अंगणवाडीच्या किचनला भेट देऊन त्यांनी खिचडीची टेस्ट घेतली. शाळेला भेट देऊन शाळेच्या मुलांच्या उपस्थिती व गुणवत्तेबाबत मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अंतर्गत घरकुलांची पाहणी केली. शिवाय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या शौचालयाची सार्वजनिक शौचालयाची, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. उमेद अभियानांतर्गत कार्यरत बचत गटाच्या महिलांशी चर्चा करून तेंडोळी येथे बचत गटाच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या सौ. ज्योतीताई निंबाळकर यांच्या बाकरवडी व मसाले उद्योगाच्या प्रकल्पाला भेट दिली व महिलांशी हितगुज साधले तसेच त्यांना केंद्रीय योजनांची सविस्तर माहिती देऊन संबंधित योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापक निर्मलचंद तिवारी,ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद राठोड, पोलीस पाटील प्रफुल गंडाईत, अंगणवाडी सेविका सौ. ज्योतीताई बोरघरे सौ. मायाताई निकुरे, आशा वर्कर सौ निता जाधव, मनोहर चव्हाण, शालिक पवार, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव शेलोटे, जितेश चव्हाण, संगणक चालक शिवाजी कोलते, ग्राम रोजगार सेवक सुशील निकुरे कोतवाल हरिदास सायरे,उमेद अभियानाच्या ग्रामसंघ अध्यक्ष सुनीता शिंदे सचिव लताताई नागोसे, सौ. ज्योतीताई निंबाळकर, सौ. वर्षाताई निंबाळकर, सौ. शारदा निकुरे, सौ रंजना नागोसे, सौ कल्पना नागोसे, पशुसखी सौ. शारदाताई निकुरे, सौ प्रियाताई सहारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©