यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथे आंतरराज्यीय लिंगायत समाज उपवधू-वर परिचय मेळावा, संपन्न

यवतमाळ येथे आंतरराज्यीय लिंगायत समाज उपवधू-वर परिचय मेळावा, संपन्न

(आठशे मुला,मुलींची नोंदणी,हजारो बांधवांची उपस्थिती लिंगायतांच्या जत्रेचे स्वरूप )

यवतमाळ : वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ मागील ३३वर्षापासून आंतरराज्यीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत आहे यावर्षी सुद्धा आंतरराज्यीय लिंगायत समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन महात्मा बसवेश्वर भवन, लोहारा येथे करण्यात आले या मेळाव्याला समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या मेळाव्यामध्ये आठशे च्या जवळपास मुला मुलींनी नोंदणी केल्या, यवतमाळच्या वधू-वर परिचय मेळाव्याला जवळपास तीन हजाराच्या वर समाजबांधवांनी, उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ अशोक मेनकुदळे मेळाव्याचे उद्घाटक वीरशैव सभा महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रा. रमेशजी आवटे, प्रमुख पाहुणे गेल ईंडीया चे निदेशक श्री. रविकांत कोल्हे,यवतमाळ सा.बा.विभाचे कार्यकारी अभियंता श्री दादासाहेब मुकडे वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयेश हातंगावकर उपाध्यक्ष प्रा. डॉ किशोर मांडगावकर सचिव निलेश शेटे , सौ. शिल्पा बेगडे, ईत्यादींची उपस्थीती होते.

सर्वप्रथम वीर केळकर,आणि शंशांक अंदुरकर ह्या चिमुकल्यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले,त्यानंतर वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे सचिव निलेश शेटे ह्यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये मंडळाचा लेखाजोखा मांडतांना मंडळाच्या प्रगतीचा अहवाल वाचुन दाखविला,आत्तापर्यंत मंडळाने केलेले कार्य ह्यांचा अहवाल सादर केला मेळाव्या मध्ये माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, आणि त्याच दिवशी माहिती पुस्तिका उपवर-वधुंना वितरीत करण्यात आली, मेळाव्याला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र सभेचे अध्यक्ष श्री रमेश आवटे यांनी यवतमाळ मेळाव्याचे भरभरून कौतुक करीत मेळावा ही आजच्या काळाची गरज आहे, यवतमाळच्या मेळाव्याची किर्ती सर्व दूर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा आहे हे ह्या गर्दीवरुन दिसत आहे असे संबोधित केले, तसेच नियोजन बध्द मेळावा आयोजित केल्यामुळे मंडळाचे कौतुक केले,तसेच मेळाव्याला अमरावती येथुन गेल ईंडीया चे निदेशक श्री रविकांत कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते, ते संबोधित करताना म्हणाले यवतमाळ चा मेळावा हा संपूर्ण राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर सुद्धा नावाजलेला आहे आपल्या वेगळ्या शैलीमुळे यवतमाळ चा मेळावा नावारूपास आलेले आहे आणि विशेषतः दरवर्षी विविध राज्यातुन तसेच राज्याबाहेरील नोंदणी या मेळाव्यामध्ये येतात हि यवतमाळ मेळ्याव्याची जमेची बाजु आहे,ईतर संस्था नी यवतमाळ मेळाव्यापासुन बोध घ्यावा असे ते म्हणाले, दादासाहेब मुकडे कार्यकारी अभियंता ह्यांनी सुध्दा समयोचीत संबोधित केले.

राज्यस्तरीय महात्मा बसवेश्वर समता पुरस्कार मिळाल्याबद्दल अकोला येथील महेशआप्पा शेटे ह्यांचा सत्कार करण्यात आला, यवतमाळ चा मेळावा म्हणजे अकल्पितच म्हणावा लागेल असे, प्रशंशापर उद्गार महेश शेटे,ह्यांनी काढले,तसेच मेळाव्याला विशेष आमंत्रित म्हणुन महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या काळात, पालकांना लग्र जुळणे करता बाहेर निघणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे, याच बाबीकडे लक्ष देऊन वीरशैव

हितसंवर्धक मंडळाने उपवधु वर परिचय मेळावा घेण्याचे ठरवले, या वधू-वर परिचय मेळाव्याला आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक, बँगलोर, तेलंगाना, जयपुर, राजस्थान, मध्यप्रदेश, इत्यादी राज्यातील उपवर-वधू नी हजेरी लावली आणि आपला परिचय दिला.

यामध्ये परीचय देणाऱ्या उप वधूवरांना वसुधा प्रतिष्ठान तर्फे सन्मानचिन्ह व रोख १५५१ रुपये त्यांना ताबडतोब देण्यात आले, तसेच प्रशांत शेटे ह्यांना ड्रॉ पध्दतीने विशेष असे गळ्यामध्ये चांदीचे लिंबु घातले असल्यामुळे त्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला, , शिवानंदआप्पा कुल्ली, बाळासाहेब नंदे, कारंजा, गजानन हमदापुरे, बाळासाहेब हवा, मंगरूळपिर ,काकासाहेब कोयटे,लासलगाव ,रमेश केळकर, डॉ. विजय उमरे,सौ मायाताई हेगु,अमरावती, यांच्या द्वारा चांदीचे लिंबु (लिंग) लकी ड्रॉ द्वारा भेट म्हणून प्रदान करण्यात आली,तसेच लि.सुनिल ठोंबरे स्मृती उपवधु-वर ह्यांना डिजिटल वॉच भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.तेजश्री मानेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गिरीश गाढवे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता डॉ. जयेश हातंगावकर, प्रा.डॉ किशोर मांडगावकर, निलेश शेटे, गिरीश गाढवे गजानन हातगांवकर, रमेश केळकर, जयंत डोंगरे,विनोद देशमुख,राजु कुऱ्हेकार,भुषण तंबाखे,चंद्रशेखर उमरे,विजयराव देशमुख, रविंद्र दिवे,विनोद नारिंगे,महेश्वर गाढवे,प्रकाश चनेवार,सुधाकर केळकर,सुरेश शेटे,डॉ.मंगेश हातगांवकर, मंगेश शेटे, अशोक तेले,अभय देमापुरे, संजय तोडकरी संजय कोचे, निर्मल ठोंबरे, प्रदीप उमरे, कैलास ठोंबरे,अभिजित हातगांवकर,

प्रविण महाजन,अनिल बेगडे,अमर केळकर,

सारंग गाढवे,आशिष रेवडी,

निखिल गाढवे,महेन्द्र ठोंबरे,शरद हातगांवकर, संजय परमा,कैलास ठोंबरे, अशोक जिवरकर, गौरव दिवे प्रदिप उमरे, अजय खारपाटे, संजय खारपाटे,राजु मेनकुदळे, पंकज शेटे, विलास केळकर, शिल्पा बेगडे कल्पना देशमुख, पद्मश्री हातगांवकर, उषा कोचे, स्वाती हातगांवकर, उज्वला नारिंगे, विद्या बेलोरकर,योगिता दर्यापुरकर, लिना चांभारे, सिमा केळकर, वैशाली केळकर,रश्मी अंदुरकर,शिला तेले,जोत्सना भाटपुरे,प्राची कामटकर, ह्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©