यवतमाळ सामाजिक

कृषीदूतांची कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

कृषीदूतांची कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी निखील पोडे, गणेश हुलके, रितेश सोहर, तेजस भाकरे, सम्राट गडलिंग, प्रलय कांबळे यांनी यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.

या भेटी दरम्यान समितीचे सहाय्यक सचिव यांनी समितीबद्ल विद्यार्थ्यांना माहिती दिली. शेतमालांचे भाव कसे ठरविले जाते आणि शेतमालाचा लिलाव कशाप्रकारे होतो, योग्य भाव मिळेपर्यंत मालाची साठवण कशा प्रकारे केली जाते या बद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘ई-नाम’ योजने बदद्ल माहिती दिली . १)राष्ट्रीय कृषि बाजार (eNAM) योजना:

शेतमालाच्या खरेदी- विक्रीसाठी केंद् शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागा मार्फत राष्ट्रीय व कृषी बाजार (ई-नाम) कार्यान्वित केले आहे. ई-नाम चे कामकाज ई-ट्रेंडीग प्लॅटफॉर्म द्वारे सुरू आहे. ‘ई-नाम ( e-NAM)’ हे ऑनलाईन पोर्टल देशभरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना एकत्र आणणारे आणि सर्वोत्तम भाव, योग्य बाजारपेठ मिळवून देणारे पोर्टल आहे. पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे, आपल्या स्थानिक शेतमालाला देशभरात पोहचवणे हा आहे. हा सर्व व्यवहार उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहकांमध्ये होत असल्यामुळे यात कोणत्या मध्यस्थांची गरज नसते. त्यामुळे कमी खर्चात आपला माल ग्राहकांकडे पोहचत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो. २)‘ई-नाम शी शेतकरी कसे जोडले जातील ?

enam.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन तेथील सर्चबारमध्ये ‘नोंदणी’ (Registration) या पर्यायाला क्लिक करा. त्यानंतर ‘शेतकरी (Farmer)’ हे पर्याय निवडल्यावर लॉन इन करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इ-मेलवर तुम्हाला तात्पुरते लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याच्या आधारे तुम्ही लॉगिन करु शकता. लॉगिन केल्यानंतर सुरु होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही आपल्या कागदपत्रांची नोंदणी करु शकता. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यास मान्यता मिळाली की, तुम्ही व्यवहार करण्यास सुरुवात करु शकता.

हा उपक्रम प्राचार्य डॉ. आर.ए.ठाकरे , उपप्राचार्य एम.व्ही.कडू , कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.व्ही.महानूर व विषयतज्ञ सी.आर.ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.

Copyright ©