यवतमाळ सामाजिक

पैनगंगा अभयारण्यात पक्षी सप्ताहाचे आयोजन

प्रतिनिधी : अर्चना भोपळे

पैनगंगा अभयारण्यात पक्षी सप्ताहाचे आयोजन

वन्यजीव वन विभाग आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना अमरावती यांचे विद्यमाने पक्षी सप्ताहाचे आयोजन

येथील पैनगंगा अभयारण्यात 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या सप्ताहात पक्षी सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनसंरक्षक

विभागीय वन अधिकारी माननीय उत्तम फड पांढरकवडा वन्यजीव हे होते तर प्रमुख पाहुणे उपवन संरक्षक भारत खेलबाडे हे होते वनक्षेत्रपाल चंद्रशेखर भोजने बिटरगाव बीट वनक्षेत्रपाल रोडगे सोन दाबी बीट वनक्षेत्रपाल धीरज मदने खरबी बीट वनशेत्र पाल रत्नपारखी कोर्टा बीट महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना अमरावती यवतमाळ जिल्हा समन्वय डीजी पाईकराव पक्षी अभ्यासक आनंद उगले सर पक्षी मित्र राम गाडेकर पक्षी मित्र सय्यद मोसिन सर राजारामबापू विद्यालयाचे मुख्याध्यापक कदम सर शिक्षक वृंद आणि दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनी वनकर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते. सर्वप्रथम प्रस्तावना सादर करताना महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे यवतमाळ जिल्हा समन्वय माननीय डीजी पाईकराव यांनी महाराष्ट्र पश्चिम संघटनेचे उद्देश व कार्य विशद करून महाराष्ट्र शासन वन विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्याचे शासन परिपत्रक जारी केल्याबद्दल वन मंत्रालयाचे आभार मानले तसेच 5 नोव्हेंबर श्री मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि 12 नोव्हेंबर दिवंगत डॉक्टर सलीम अली यांची जयंती असल्यामुळे या दोघांचे कार्य पक्षी अभ्यासक म्हणून जगात प्रसिद्ध आहे आहे म्हणून हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून म्हणून साजरा करण्याचे आवाहन पक्षी प्रेमींना केलं तसेच या काळात स्थलांतर पक्ष्यांच्या नोंदी देखील घेता येतात असे सांगितले. पक्षी अभ्यासक आनंद उगले सरांनी पक्षाचे वनसंवर्धनाचे कार्य त्याचे महत्त्व त्यांचा अधिवास पर्यावरणाचे जतन याविषयी विस्तृत माहिती दिली तर पक्षी मित्र राम गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी विविध पक्षाचे रंग त्यांचे आवाज त्यांचे घरटे त्यांच्यामार्फत होणारे बीज प्रसारण याविषयी अभ्यास करावा असे सुचविले उपवनसंरक्षक माननीय भारत खेलवाडे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे हा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल परंतु विद्यार्थ्यांनी आपला छंद वर्षभर जोपासावा आणि पक्षी अभ्यास करावा याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी वनक्षेत्रपाल भोजने वनक्षेत्रपाल मदने वनक्षेत्रपाल खोडके वनक्षेत्रपाल रोडगे यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले की त्यांनी वन विभागाच्या परीक्षा देऊन वनाधिकारी बनावे आणि वनांचे संरक्षण करावे असे आव्हान केले अध्यक्षीय भाषणात विभागीय वनाधिकारी माननीय फड साहेब यांनी वनांचे महत्त्व त्यांचे फायदे पर्यावरणाची गरज आणि त्याविषयी आवड छंद विद्यार्थ्यांनी जोपासावी याविषयी मार्गदर्शन केले. आभार राजाराम बापू पाटील विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सय्यद मोसिन सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंद वनकर्मचारी पक्षीमित्र आणि वन अधिकारी यांनी परिश्रम घेतले. सकाळच्या वेळेस पैनगंगा अभयारण्यातील जवराळा येथील तलावावर पक्षी निरीक्षण करून जवळजवळ 35 पक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या यावेळी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सुशांत चव्हाण आणि त्यांचा सहकारी निशांत नांदेड यांनी पक्षांच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या तर वन कर्मचारी एस पी पोटुलवाड हे एस आर टी एम यू नांदेड विद्यापीठात वन पर्यावरण विषयात पीएचडी करीत असल्याबद्दल विभागीय वनाधिकारी फड साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Copyright ©