यवतमाळ सामाजिक

अतिवृष्टीचा व पूरपिढीचा मोबदला न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना मातीचा प्रतिकात्मक फराळ भेट

आर्णी प्रतिनिधी आशिफ खान

अतिवृष्टीचा व पूरपिढीचा मोबदला न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना मातीचा प्रतिकात्मक फराळ भेट

आर्णी तालुक्यात जून,जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली नदी नाल्यांना भयंकर पुर आल्यामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अतिवृष्टी व पुरवपीडीचा मोबदला पोळा सणाला मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती नंतर दसरा गेला आणि आता दिवाळी झाली तरी आजपर्यंत शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे व पूर पिढीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे ,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आरणी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर्णी तालुकाध्यक्ष श्री. सुनील पोतगंटवार यांच्या नेतृत्वात आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी आर्णी ना.तहसीलदार उदय तुंडलवार‌ यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना दिवाळीचे प्रतीकात्मक मातीचे फराळ म्हणून माती पासून तयार केलेले अनारसे,करंजी,शंकरपाळी,

चकल्या‌ , लाडू ,चिवडा इत्यादी ना. तहसीलदार मार्फत महाराष्ट्रा च्या मुख्यमंत्र्यांना दिवाळीची भेट म्हणून यावेळी देण्यात आले.

शासनाच्या उदासीन धोरणामुळे आर्णी तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांचा पोळा , दसरा व दिवाळी हे महत्त्वाचे सण उत्साहा ऐवजी निराशेत गेले, शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन आणि प्रतीकात्मक मातीपासून बनवलेले फराळ मुख्यमंत्र्यांना ना. तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले.

यावेळी मुबारक तंवर व सुनील पोतगंटवार यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश राठोड ,ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष भारत काळबांडे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष गणपत पाटील जगताप ,तालुका सरचिटणीस संजय खंदार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष कृष्णा पावडे, सुनील चव्हाण , यासीन नागानी, शंकर मिर्जापुरे , सदानंद पुरी, संदीप चव्हाण, निशांत हलबी , रवी कांबळे ,अनिल कुडुमते , कैलास राठोड

इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Copyright ©