यवतमाळ सामाजिक

चक्क शेतीच्या बांधावर निराधार कुटुंबाला मदतीचा हात!

चक्क शेतीच्या बांधावर निराधार कुटुंबाला मदतीचा हात!

ग्रामसेवक संजय दुधे यांचा पुढाकार

महागाव क येथील एका गरीब कुटुंबातील विदारक परिस्थिती कळताच ग्रामसेवक संजय दुधे यांनी चक्क शेत बांधावर जावून दिपावली च्या पर्वावर कपडे व फराळ साहित्य देवून मानवतेचे दर्शन घडविले.

महागाव क येथील जिजाबाई नामक महिला आपल्या जुळ्या मुलींसह वास्तव्यास आहे. घरी अठरा विश्व दारिद्र्य. रस्त्याच्या कडेला टिन पत्र्याच्या छोट्याशा घरात त्या तिघी माय लेकी राहतात . मोल मजुरी करून पोटाची खळगी भरतात. लोक सहभागातून सोनू मोनू नामक जुळ्या बहिणी शिक्षण घेत आहे. त्या वंचित कुटुंबा विषयी संवेदनशील व्यक्तिमत्व ग्रामसेवक संजय दुधे यांना कळताच दिपावलीच्या पर्वावर मदतीचा संकल्प केला. त्या कुटुंबाला मदती करिता संजय दुधे महागाव क येथे पोहचले असता त्या तिघी माय लेकी शेतात मजुरी काम करीत होत्या. तेव्हा संजय दुधे यांनी चक्क शेतात जावून त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना नवीन कपडे व फराळ साहित्य सुपूर्द केले. शेतीच्या बांधावरील हा भावूक क्षण प्रेरणादायी असून त्या कुटुंबाच्या आयुष्यात दिपावलीच्या पर्वावर प्रकाश घेवून आला.

बिडीओची तत्परता

दरम्यान त्या कुटुंबा विषयी दारव्हा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांना कळताच त्यांनी किराणा साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत पाठविली. विशेष म्हणजे तांत्रिक अडचणी दूर करून त्या निराधार कुटुंबाला शासकीय योजनेतील घरकुल देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

Copyright ©