यवतमाळ सामाजिक

दिवाळी पूर्वी अतिवृष्टी व विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मनसे शहर अध्यक्ष कपिल भाऊ ठाकरे यांची मागणी

तालुका प्रतिनिधी आर्णी विकास ठमके 

दिवाळी पूर्वी अतिवृष्टी व विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मनसे शहर अध्यक्ष कपिल भाऊ ठाकरे यांची मागणी

आर्णी – विविध नैसर्गिक संकटात शेतकरी होरपळत असून , सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा करण्यात येता आहे.

तालुक्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना शेती व्यवसाय डबघाईस चालला आहे. पावसाच्या अनियमित पणामुळे कधी कोरडा दुष्काळ कधी ओला पडत असल्यामुळे खर्चा एवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे. पीक विमा योजना नावालाच उरल्यामुळे दुष्काळात नुकसान मोठ्या प्रमाणात होवूनही पीक विम्यापासून शेतकरी वंचित रहात आहे. पीक विमा कंपनीचे निकष दरवर्षी बदलत असल्याने पीक विमा मिळण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची आशा मावळताना दिसत आहे आणि दिवाळी जवळ आली आहे म्हणून दिवाळी पूर्वी अतिवृष्टी व विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष कपिल भाऊ ठाकरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Copyright ©