यवतमाळ सामाजिक

मानधन वाढ मागणीसाठी अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेची जिल्हा परिषदेवर धडक

मानधन वाढ मागणीसाठी अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेची जिल्हा परिषदेवर धडक

आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेची मानधनात वाढ करण्यात यावी या मुख्य मागणी साठी जिल्हा परिषदेवर धडक आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य व मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवले आहे स्थानिक मागणी अंशकालीन स्त्रि-परिचरांना युनिफॉर्म व ओळख पत्र एक महीण्यात देण्यात येईल तसे आरोग्य विभागाला कळविले आहे असे आश्वासन शीओ साहेबांनी संघटनेला यावेळी दिले तसेच

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या ठिकाणी नर्सेसना मदत करणाऱ्या अंशकालीन स्त्री-परिचरांना त्यांच्या कामाच्या तुलनेत मिळणारे एकत्रीत मानधन / वेतन निव्वळ तुटपुंजे असल्यामुळे त्यांच्यावर वेठबिगारीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे. केंद्र सरकार दरमहा रु. १००/- व राज्य सरकार रू. २९००/- असे एकत्रीत दरमहा रू. ३०००/- मानधन / वेतन देत आहे. त्यात ह्या जिवघेणा महागाईत दोन वेळेचे जेवण सुध्दा भागत नाही. अलीकडे आपण अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ केली. त्यांना दिवाळी, भाऊबीज लागू केली. परंतु आम्ही जिल्हा परीषदेची निर्मिती झाली तेव्हापासून कार्यरत आहोत. तरी शासन आमच्या मानधन वाढीकडे लक्ष देत नाही, आरोग्य विभागाकडून तुमचा वेतनवाढीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे सादर केला आहे, एवढेच उत्तर मिळते, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही याकडे शासनाचे लक्ष आम्ही वेधत आहोत. आपण लक्ष देवून मानधनात वाढ करावी व दिवाळी भाऊबीज लागू करावी अशी आमची मागणी आहे.

यापूर्वी अनेक वेळा आंदोलन करून अंशकालीन स्त्री-परिचरांना आरोग्य खात्यात कायम करा, किमान वेतन रू. २६,०००/- वेतन द्या. अशी मुख्य मागणी संघटनेच्या वतीने करीत आहोत. दि. २० ऑगस्ट २०१४ रोजी मा. आरोग्य संचालक मुंबई यांनी अंशकालीन स्त्री-परिचरांना रु. १०,०००/- देण्यात यावे अशी शिफारस केली. आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. आताही आरोग्य खात्याने मंत्री मंडळाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे, त्याची अंमलबजावणी करावी. तसेच आरोग्य खात्यात अन्य कर्मचाऱ्यांनावेतन श्रेणी सहीत बरेच आर्थिक लाभ मिळतात. पण समान कामाला समान वेतन ह्या सूत्रांनुसारअंशकालीन स्त्री-परिचरांना डावलले जाते.

मागण्या अंशकालीन स्त्री-परिचरांना जि. प. सेवेत कायम करा, किमान वेतन दरमहा रू. २६,०००/- मानधन / वेतन द्या, त्यांना दिवाळीपूर्वी एक महिन्याचे वेतना एवढे दिवाळी भाऊबीज लागू करा, अंशकालीन स्त्री- परिचर ह्या अर्धवेळ असतांना त्यांचेकडून आरोग्य कर्मचारी पुर्णवेळ काम करून घेतात त्यामुळे त्यांना पुर्णवेळ कर्मचारी करा, वारसांना सेवेत घ्या, पेन्शन योजना लागू करा, जिल्हा परीषद यवतमाळ यांनी अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीनुसार गणवेश द्या, इत्यादी मागण्या करण्यात येत आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून सत्वर मागण्या निकाली काढाव्यात अन्यथा दिवाळी नंतर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारा लागेल असे म्हटले आहे यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे, सायराबी शेख, निशा आडे,कुसु जोगदडे, लक्ष्मी बोके, कांता मोरे, कविता राठोड,कमल बेले, वंदना सगसेळे, अंजनाबाई सरकुडे, मंगला लबे,पदमीना ठाकरे,लीला पवार, छाया जामनकर,जोती राठोड, निर्मला कोवे, वर्षी तोडसाम, ललीता भोयर,शारदा भेळे, माला आडे, शोभा झाडे, सुनिता भस्मे, मंदा राऊत, पुण्याता कांबळे,आशा आत्राम ,प्रतिभा सुकळकर,उमा शीरनाथ,शालु राठोड, सुवर्णा सोनुने, वर्षा पिसे,रेखा लेगरे, कल्पना सवाईमुल, अनुसया सोनकुसरे, सुमित्रा जमदाळे,विधा गिरोलकर, सगिता राठोड,छाया पळघाने, नंदा कांबळे,कुसुम मानकर, कौसल्या चव्हाण, सगिता कोटनाके,शारीकला भगत,सुशिला दर्शनवार, सध्या पाटील,उषा राठोड, वंदना मागुळकर, बेबी ठाकरे,माला राठोड, रेखा भुजाडे, रंजना तायवाडे, निर्मलाबाई कोल्हे, वत्सला ननपटटे, सगिता जाधव,वेनु कांबळे,धोडाबाई आगोसे,या सह शेकडो महिला उपस्थित होत्या

Copyright ©