यवतमाळ सामाजिक

वेदना कोन समझनार वृद्धाश्रम मधल्या अनाथ मायबापाची

ता. प्र.आर्णी विकास ठमके  

वेदना कोन समझनार वृद्धाश्रम मधल्या अनाथ मायबापाची

आर्णी: येत्या काही दिवसात सर्व सणांचा राजा म्हणजे दिवाळीचा सण येणारं आहे..दिवाळी हर्ष उल्हासाचा सण.. कुटुंबातील लहान मोठ्यांना नवनवीन कपडे, मुलांसाठी फटाके, वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ आणि जे काही आवश्यक असेल त्या वस्तूंची खरेदी करून दिवाळी आपणं मोठ्या आनंदात साजरी करतो.

पणं जे आश्रमातील अनाथ मुलं आहेत त्यांच्या कोवळ्या मनाला काय वाटत असेल आपल्याला जर आई वडील असते तर आपल्यालाही नवीन कपडे, फटाके, वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ मिळाले असते.. किती मोठं दुःख हे..! आणि वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना काय वाटत असेल जर आपणं आपल्या घरी असतो तर आपणही मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली असती हा विचार करून ते दुःखी होत नसेल का..?

देवाच्या कृपेने आपणं सुखी आहोत आपणं शक्य तेवढी मदत केली तर त्या अनाथ मुलांची , निराधार वृद्धांची दिवाळी गोड करू शकतो. आपल्या आर्णी येथील मातोश्री सुशिलाबाई मा. नागपुरे वृद्धाश्रमात चार अनाथ मुली आहेत आणि १०८ वृद्ध आहेत. अनाथांचा बाप बनून खुशालभाऊ नागपुरे या सर्वांचा सांभाळ करून त्यांचा जगण्यास बळ देत आहे सोपी गोष्ट नाही दररोज १०८ लोकांची व्यवस्था करणे.. म्हणून आपणं आपल्या स्वइच्छेने मदत करून या आश्रमातील मुलींना ड्रेस, वृद्धांना कपडे, धोतरं पान, महिलांना पातळ, साड्या तसेच फराळाचे साहित्य आणि इतर अनेक जीवनावश्यक वस्तूं घेण्याकरिता मदत करून आपल्या बरोबरच या अनाथ मुलींची, निराधार वृद्धांची दिवाळी गोड करून त्यांच्याहि चेहऱ्यावर आनंद फुलवून साजरी करूयात..

Copyright ©