यवतमाळ सामाजिक

एक दा तरी आमच्या रस्त्याने याहो साहेब लोकप्रतिनधींना मोहन ठाकरे यांचे आवाहन  

ता. प्र.आर्णी : विकास ठमके

एक दा तरी आमच्या रस्त्याने याहो साहेब लोकप्रतिनधींना मोहन ठाकरे यांचे आवाहन 

आर्णी: आर्णी तालुक्यातील बोरगाव शी.भंडारी ते बेलोरा या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्यामुळे ग्रामस्थांना रोज ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना बस सेवा नसल्यामुळे ऑटो ने ये जा करण्यासाठी अतिशय कठीण झाले आहे आजारी व्यक्तींना रुग्णसेवेसाठी आर्णी या शहराकडे नेण्यास या रस्त्याने अवघड झाले आहे या रस्ता संदर्भात आजपर्यंत ही कुठली दखल घेण्यात आलेली नाही बोरगाव शी.भंडारी ते बेलोरा हे रस्ता पावसाळ्यात जलमय होवून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या रोडवर पाहायला मिळते ग्रामीण भागातील रस्त्याच्या समस्या कडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात त्यामुळे भंडारी या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मोहन ठाकरे असा प्रश्न उपस्थित करत आहे की आम्हाला समृद्धी महामार्ग नको धड रस्ते तर बनवून द्या असे आर्त हाक देत आहे या रस्त्यावर खूप भयानक मोठमोठे खड्डे पडले आहे तुम्ही या रस्त्याने प्रवास करून बघाच साहेब असे मोहन ठाकरे यांनी सांगितले या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत नसल्यामुळे किरकोळ अपघात घडत आहे गेल्या खूप वर्षापासून या रस्त्या संदर्भात अनेक वृत्त प्रकाशित करून दखल नाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची या रस्त्या संदर्भात लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही मरणस्त्र अवस्थेतून मरणास्तव अवस्थेतून बाहेर काढून रस्त्याचा मार्ग निकाली काढून सुविधा देण्यात यावी अशी मागणी भंडारी या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मोहन ठाकरे यांनी केली आहे

Copyright ©