यवतमाळ सामाजिक

सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको 

उमरखेड प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको 

नागपुर तुळजापुर ह्या राष्ट्रिय महामार्गावर पेनगगा नदीच्या पुलावर व

नांदेड यवतमाळ पळशी फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पळसी फाटा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मुळावा ,पोफाळी, अंबाळी परिसरातील सकल मराठा समाजाकडून आज पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या मार्गावरील वाहतुक दोन तास रोखण्यात आली . मुळावा येथे परिसरातील 12 गावांच्या वतीने साखळी ऊपोषण चालू आहे . लगतच्या पोफाळी येथे छत्रपती शिवजी महाराजाच्या पुतळ्या समोर सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण चालूआहे . पोफाळी लगतच्या आंबाळी फाटा येथे पळसी ,नागापूर अंबाळी ,मरसुळ ,बेलखेड ,दिवट पिंपरी येथील गावांचे साखळीउपोषण चालू आहे आंबाळी फाटा येथे कांही म पुरुषा समवेत महिलासुद्धा आमरण उपोषण करीत आहेत . सकल मराठा. समाजाच्या वतीने आज पुन्हा पळसी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला . परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांनी सुमारे दोन तास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले असल्याची माहीती ठाणेदार दिपक ढोमने पाटील यांनी दीली पोलीसाच्या वतीने चोख बंदोंबस्त ठेवण्यात आला .

मुळावा परिसरात वानेगाव, पार्डी,कळमुला मराठा आरक्षणासाठी पळशी येथे रस्ता रोको मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांना पाठिंबाबत ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आज पळशी फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला तसेच मुळावा येथे साखळी उपोषण चालू आहे . आंबोळी फाटा येथे सुद्धा आमरण उपोषण चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाज तीव्र अ शा प्रकारचे आंदोलन करीत आहे

परिसरात कळमुला ,पोफाळीवानेगाव ,पार्डी ,तिवरंग ,|दीवटपिंपरी येथे सकँडल मार्च काढण्यात आला . मोठ्या संख्येने सकल मराठा सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते .

Copyright ©