Breaking News यवतमाळ

मराठा आरक्षण आंदोलन पेटले

उमरखेड प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलन पेटले

– जरांगे पाटलांना काही झाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा मराठा बांधवांचा इशारा

– आंदोलकांनी पळशी येथे महामार्ग रोखला

मराठा आरक्षण आंदोलनाची धग उमरखेड ग्रामीण मध्ये पसरली असुन गावोगावी आंदोलनाची मशाल प्रज्वलित झाली असुन विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण,साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यामध्ये त्यांची प्रकृती खालावत असल्याने सर्वत्र मराठा समाजाच्या संतापाचा उद्रेक होत आहे .मुळावा सह परिसरातील 12 गावामध्ये मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनाला स्वयंस्फूर्तीने सुरुवात करून ग्राम पंचायत मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना गावात फिरु न देण्याचा ठराव घेत गाव बंदी केली असल्याचे फलक गावाच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत.आज यवतमाळ येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार उपस्थित राहणार होते.राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना शासनाने यवतमाळ येथे कार्यक्रम आयोजित करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप करीत शासनाच्या या कृतीचा निषेध करीत जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये असे आवाहन करण्यात आले होते तसेच उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला जाता कामा नये यासाठी पळशी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी उमरखेड पुसद ,हिंगोली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे वाहतूक ठप्प होवुन सर्वदूर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोफाळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले. तसेच ठाणेदार दीपक ढोमणे यांनी सर्व ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करून शांततेचे आवाहन केले आहे.

Copyright ©