यवतमाळ सामाजिक

विघुत वितरणविरोधात उद्या सावळी सदोबा येथे साखळी उपोषण

विघुत वितरणविरोधात उद्या सावळी सदोबा येथे साखळी उपोषण

(२३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या रस्ता रोको आंदोलनाचा काही परिणाम नाही)

सावळी सदोबा- आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या दुर्गम व आदिवासी बहुल परिसरातील 42 गावांमध्ये विघुत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या परिसरात विजेच्या समस्यांनी परीसरातील नागरिक त्रस्त झालेले आहे,मागील एका महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असुन,विघुत महावितरण कंपनीचा कोणताच अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत,त्यामुळे सावळी सदोबा परिसरातील शेतकरी व नागरीक चिंताग्रस्त झाले आहेत,शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरीला पाणी असुन सुद्धा विजे अभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाळुन चालली आहे,अगोदरच शेतकरी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेला आहे,त्यात विजेची समस्या कायम आहे,अशा विधारक परिस्थिती निर्माण झाली आहे, खंडित वीज पुरवठ्यामुळे परीसरातील बहुतांश गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजना बंद असल्याने, गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे,विजेच्या गंभीर समस्येकडे शासनाने व विघुत महावितरण कंपनीचे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्या ३० ऑक्टोंबर सोमवार रोजी नायब तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे,विद्युत समस्या ची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहेत,

Copyright ©