यवतमाळ शैक्षणिक

डॉ पं.देशमुख कृषी विद्यापिठ येथे पशु लसीकरण शिबिराचे आयोजन

उमरखेड प्रतिनीधी

डॉ पं.देशमुख कृषी विद्यापिठ येथे पशु लसीकरण शिबिराचे आयोजन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विधमाने येथील सातव्या सत्रातील कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पशुपालक शेतकऱ्यांना पशूवर येणाऱ्या संसर्गजन्य आजारावर वेळीच प्रतिबंध घालण्या करिता लसीकरणाबाबत शेतकन्यांना व पशुपालकांना मार्गदर्शन केले.सध्या ढगाळ वातावरण व सतत पाऊस सुरू असल्याने या वातावरणात पशूंमध्ये (संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. परिणामी वेळीच पशूची काळजी व उपचार न केल्यास पशु दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या सर्व बाबींचा विचार करता, कृषी महाविद्यालय येथील सातव्या सत्रातील विद्यार्थी निखिल चांदेकर, मयूर कोराम, सुयश इंगळेयांनी उपस्थित शेतकन्यांचे व पशुपालकांचे मार्गदर्शन केले. विशिष्ट प्रकारच्या लसीकरणामुळे फन्या, घटसर्प, ऑन एक्स व आंत्रविषारी इत्यादी रोगाचे प्रादुर्भाव

टाळणे सहज शक्य तर होतेच. शिवाय जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार विरुद्ध रोग प्रतिकारशक्ती तयार होते.यासाठी लसीकरणापूर्वी पशुपालकांनी आपल्या जनावरांना जंतनाशक तसेच जनावरांच्या बाह्य अंगावर असणारे पतजीवांचे औषदी उपचार देऊन नियंत्रण करावे.

याबाबत विद्यार्थ्यांनी सविस्तर मार्गदर्शन करीत पशुपालकात लसीकरणाबाबत असलेले संभ्रम दूर केले.याप्रसंगी तालुका लघु पशु वैद्यकिय सर्व चिकित्सालय उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब कुंभार आणि स्वराज देशमुख यांनी जनावरांचे लसीकरण केले.यावेळी कृषि महाविद्यालय, उमरखेड चे प्राचार्य श्री. एस. के. चोतले व ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव कार्यक्रमाचे अधिकारी स.प्रा. वाय. एस. वाकोडे, पशुसंवर्धन विभागाचे विषयतज्ञ स. प्रा. विपुल माने, तसेच स.प्रा. ए. एस. राऊत, प्रा. के. एस. आगे आणि स.प्रा. अक्षय तामसेकर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले

Copyright ©