यवतमाळ सामाजिक

न.प.चे प्रथम अपिलीय अधिकारीच करतात सुनावणीस टाळाटाळ

दिग्रस प्रतिनीधी

न.प.चे प्रथम अपिलीय अधिकारीच करतात सुनावणीस टाळाटाळ

दप्तर दिरंगाई करणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यांवर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांची कृपादृष्टी

नगर पालिका प्रशासनातील विविध विभागातील जन माहिती अधिकारी मुद्दतीत माहिती देत नसल्याने अनेक माहिती अधिकार अर्जदारांना अपिलात जावे लागत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते मानसिक त्रास सहन करीत आहे. अश्याताच अपिलात गेल्यावर प्र.अ.अधिकऱ्यानी सुनावणीची तारीख निश्चित केल्यावर पण जन माहिती अधिकारी उपस्थित नसतात तेंव्हा प्र.अ.अधिकारी फक्त तोंडी फर्मान सूनाऊन मोकळे होतात .असे प्रकार अंगिनित आहेत पण जेव्हा प्रथम अपिलीय अधिकारी सुनावणीची तारीख निश्चित करून अपीलार्थी व सर्व विभागाच्या ज.मा अधिकाऱ्यांना पत्र देउन कळविल्या जाते तेंव्हा जन माहिती अधिकारी कार्यालयात असून सुधा सुनावणीला महत्व देत नाही असे प्रकार पण दिग्रस न.प. च्या विविध विभागांचे जन माहिती अधिकारी करतात. हे काय कमी होते या उलट जाऊन प्रत्यक्ष न.प. चे प्रथम अपिलीय अधिकारीच सुनावणीची तारीख देऊन उपस्थित राहत नाहीत.

काल गुरुवार दिनांक २६-१०-२०२३ ला माहिती अधिकारात प्रर्थम अपिलाची सुनावणी मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या दालनात ठीक ४वाजता घेण्यात येणार होती मात्र प्रथम अपिलीय अधिकारीच कार्यालयी उपस्थित नसल्याने कार्यालयीन अधीक्षकाने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आजच्या सुनावणीसाठी अपिलार्थी आले असल्याचे कळविले असता त्यांनी सुनावणीस नकार दिल्याचे कळले.

आज सुनावणी का होत नाही साहेब तर काही वेळा पूर्वीच कार्यालयात होते.अपिलार्थी ने का.अधिक्षकास असा प्रश्न करून तक्रार बुकाची मागणी केली असता

तक्रार बुक नाही. जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर जिल्हा अधिकाऱ्यांकडे करा,

आज होणारी सुणावनी साहेबांच्या सांगण्यावरून होऊ शकत नाही पुढील सुनावणी दिनांक व वेळ आपल्यास फोन द्वारे कळविल्या जाईल

कार्यालयीन अधीक्षक योगेश दुधे

Copyright ©