यवतमाळ सामाजिक

नवरात्र उत्सवात सापडलेली लेडीज पर्स दिली परत

नवरात्र उत्सवात सापडलेली लेडीज पर्स दिली परत

यवतमाळ शारदीय दुर्गामाता नवरात्र उत्सवात लाखेच्या संख्येने भाविक दुर्गादेवी उत्सव बघण्यासाठी सम्पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून तसेच विविध अनेक जिल्ह्यातील देशातून असंख्य भाविक गण नवरात्र उत्सव बघण्यासाठी व दर्शनासाठी शहरात येतात,

शहरांतील अनेक दुर्गादेवी मंडळाचे डोळ्याचे पारणे फेडणारे रायननाम्या मंत्रमुग्ध करणारे देखावे बघताना भाविकगण देहभान हरवून दर्शनाचा व सुंदर देखाव्याचा आनंद घेत रात्रभर शहरात विविध देवी मंडळांना भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेत असतात.

अशातच शनिवार दिनांक 24/10 ला एका दुर्गादेवी मंडळात विनोद दोंदल याना लेडीज पर्स सापडली, त्या लेडीज पर्स (हैंडबैग) मध्ये आधार कार्ड व पोस्टाचे खाते कार्ड व खूप सारे पैसे होते, आधार कार्डावर फक्त महिलेचे नाव, गावाचे नाव सोनेगाव जिल्हा यवतमाळ लिहला होते, तालुका लिहून नसल्या कारणाने संबंधित पर्स असलेच महिलेचा शोध घेणे कठीण झाले, सर्विकडे शोध घेवुन व विचार पूस करून देखिल जांची पर्स होती त्यांना शोध लागत नव्हता, पर्स सापडण्याची पोस्ट शोषण मीडियावर वॉट्सप, फेसबुक वर व्हायरल केली, फेसबुक एका व्यक्तीला आपल्या ओळखीचे वाटल्याने त्यांनी त्याची माहिती दिली,

या प्रकारे शोध घेऊन यवतमाळ मधेच किरायाने एक खोली करून आपले शिक्षण घेत असलेल्या त्या मुलीची विनोद दोंदल यांनी स्वतः सहकुटूंब त्या मुलीची भेट घेऊन मुलीला तिची हरवलेली लेडीज पर्स परत केली, आपली हरवलेली पर्स त्या मधील पैसे व कागदपत्रे मिळाल्याने मुलीला खूपच आनंद झाला हे तिच्या चेहऱ्याच्या हावभावा वरून दिसून येत होते…

Copyright ©