यवतमाळ शैक्षणिक

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विध्यार्थ्यांची अकोला बाजार येथे बुलढाणा अर्बन बँक ला भेट

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विध्यार्थ्यांची अकोला बाजार येथे बुलढाणा अर्बन बँक ला भेट

शिकू या थोडं व्यवहारिक ज्ञान या नवीन उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 21ऑक्टोंबर 2023 रोजी लेट

अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल रूई च्या विद्यार्थ्यांनी बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या अकोला बाजार शाखेला सदिच्छा भेट दिली. शाखा व्यवस्थापक शुभांगी गावंडे यांनी विद्यार्थ्यांना शाखेत चालणाऱ्यां व्यवहारांबद्दल व संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्यां उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना माहीती दिली व विद्यार्थ्यांनी डिपॉजिट म्हणजे काय, लोन म्हणजे काय, विमा म्हणजे काय, बचत म्हणजे काय, खाते कसे उघडतात, एटईम म्हणजे काय बँकेत व्यवहार कशे चालतात असे असंख्य प्रश्न विध्यार्थ्यानी विचारले आणि मॅनेजर ने पण विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले.या वेळी शाखेचे कर्मचारी प्रणय खराबे, वृषभ राहुलकर, ममता कोहरे, निलेश नान्ने उपस्थित होते. ही संकल्पना शाळेच्या सहाय्य्क शिक्षिका रिना केवट मॅम यांची असून थोडं शिकू या व्यवहारिक ज्ञान असे म्हणत शाळेचे अद्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी यांनी क्षणाचाही विचार न करता हा उपक्रम राबविण्यास परवानगी दिली या मध्ये फ्रुट व्यवसायिक यांच्याशी चर्चा करून विध्यार्थ्यानी धंद्या बद्दल माहिती मिळवून घेतली, भाजीपाला व्यावसायिक, स्वीट मार्ट व्यावसायिक, हार्डवेअर व्यवसायिक, मेडिकल स्टोअर्स तसेच कॅपम्पुटर चे संचालक कांचन भवरे यांच्यासोबत कॅम्प्युटरची सखोल माहिती मिळविली शाळेच्या व्यतिरिक्त विध्यार्थ्यांना दररोजच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते तसेच विध्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान असणे खूप गरजेचे आहे जेणेकरून या सर्व माहिती मुळे विध्यार्थ्यांना त्याच्या जीवनात उपयोगी पडेल असे व्यावहारिक ज्ञान देण्याचं प्रयत्न शाळा आणि शिक्षक अविरतपणे करीत असते यासाठी इतर ही शिक्षकांनी कल्याणी करपती , अमर भगत , नम्रता केवट , सानिया सय्यद , सोनाली कुडमते , संध्या ताई मोहळे यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©