यवतमाळ शैक्षणिक

स्व.राजकमलजी भारती कला, वाणिज्य महाविद्यालयात धान्य रांगोळी कार्यशाळा संपन्न

स्व.राजकमलजी भारती कला, वाणिज्य महाविद्यालयात धान्य रांगोळी कार्यशाळा संपन्न

स्व.राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी येथे धान्याची रांगोळी कार्यशाळा संपन्न

स्थानिक स्व.राजकमलची भारती कला वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय,आर्णी येथे धान्याची रांगोळी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.ए.पिस्तूलकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनीत माहुरे उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ही कार्यशाळा गृह अर्थशास्त्र विषयाअंतर्गत बी.ए. भाग दोन आणि बी.ए भाग तीन च्या विद्यार्थिनींकरिता आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. एन. ए.पिस्तूलकर यांनी मानवाच्या जीवनात हवा पाण्याची आवश्यकता असते तेवढ्याच महत्त्वाचे अन्न देखील असते जर उत्तम आहार घेतल्या जात असेल तर शरीर सुव्यवस्थित ठेवणे, कार्यशक्ती वाढविणे,सुखी आनंदी व समाधानी आयुष्य जगणे, एवढेच नव्हे तर दीर्घायुष्यही लागते. या प्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. विनीत माहुरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे विपुल प्रमाणात तृणधान्याचा पुरवठा होतो. म्हणून लोकांच्या रोजच्या आहारात प्रमुख धान्य म्हणून 80% तृणधान्य असतात. आवश्यक कॅलरी जवळपास यापासून प्राप्त होतात व इतर अन्न घटकांच्या तुलनेत स्वस्त देखील असतात. तसेच प्रत्येकाच्या आहारात तृणधान्य हे प्रमुख धान्य म्हणून वापरले जाते या प्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कु. अनामिका चावरे हिने केले. या कार्यशाळे करिता जवळपास सर्वच विद्यार्थिनींचा सहभाग होता.

Copyright ©