यवतमाळ शैक्षणिक

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजना अंतर्गत दि.15/10/2023 रोजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन जयस्वाल ह्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले  महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे मोहिम सुरू केली आहे परंतु अजुनही बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती भरता येत नाही त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येताना दिसून आल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या सर्व बाबींची माहिती मडकोणा या गावी देण्यात आली. प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले

प्रशिक्षणा दरम्यान गावाच्या तलाठी आंबेकर तर सरपंच रविंद्र तालेकर ह्याचे मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती कडुन सर्टिफिकेट 1 देवून गौरवण्यात आले               सदर कार्यक्रमा करिता रोहन गायकवाड ,दिपाली ठाकरे, वैष्णवी बगमारे ,तुषार दडांजे, विठ्ठल कुऱ्हाडकर, अर्थराज राठोड, रोशन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©