यवतमाळ शैक्षणिक

उमरखेड च्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनी पोफाळी येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

उमरखेड च्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनी पोफाळी येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड च्या कृषिदूतांनी पोफाळी शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कृषिदुत निखिल चांदेकर,अनिकेत शिरभाते, मयूर कोराम, सुयश इंगळे,कृष्णा गावंडे, शुभम शेडमाके, वैभव धंदर, पियूष मोरे ,शेतकऱ्यांना रोग नियंत्रण कसे करावे या विषयी माहिती देत आहे. तसेच दुधापासून विविध पदार्थ कसे बनवावे, चारा प्रक्रिया,माती परीक्षण,

जनावरांसाठी लसीकरण,

मोबाइल अॅपचा वापर कसा करावा, तन नियंत्रणासाठी पध्दती, पिकासाठी खताचा योग्य वापर कसा करावा, फळबागांची लागवड व नंतरची काळजी कशी घ्यावी या विषयी विविध प्रात्यक्षिके दिले जात आहे. या उपक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंताले यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव

कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. वाय. एस. वाकोडे, प्रा. ए. बी. तामसेकर, प्रा. ए. एस. राऊत, प्रा. ए. बी. इंगळे, प्रा. के. एस. आगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले. या उपक्रमाला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला

Copyright ©