यवतमाळ सामाजिक

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा

भारतरत्न, देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टो. हा जन्मदिवस “राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस” म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. सोमवार, दि. 16 ऑक्टो. 2023 रोजी स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्राच्या वतीने “वाचन प्रेरणा दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. मा. डॉ. मोहन खेरडे, माजी संचालक, ज्ञान संसाधन केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तथा अध्यक्ष, भारतीय ग्रंथालय संघ आणि अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालय संघ यांनी उपस्थीत राहून महाविद्यालयीन ग्रंथालय संग्रह, सेवा आणि ग्रंथालय राबवित असलेल्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. “वाचन संस्कृती व ग्रंथालय माहिती साक्षरता: महत्त्व आणि आवश्यकता” या विषयावर उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील डॉ. खेरडे सरांच्या अतुलनीय योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. गजानन माने इंग्रजी विभाग यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे “प्रेरणादायी संघर्षमय जीवन व देश विधायक, रचनात्मक कार्य” ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. कार्यक्रमास ग्रंथपाल श्री. भूषण दयावते, आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेरा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक कोटुरवार, प्रमूख, राज्यशास्त्र विभाग यांनी भूषविले. त्यांनी उपलब्ध विपुल व समृद्ध वाचन-सहित्याचा महत्तम उपयोग करुन घेण्याहेतू विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नियमित येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम ह्यांच्या प्रतिमेस वंदन करुन झाली. मान्यवरांचे मनस्वी स्वागत ग्रंथ-भेट देऊन करण्यात आले. उपास्थित विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांचे जीवन व कार्य विषयक प्रश्न विचारून ग्रंथ-भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल, डॉ. संजय शेणमारे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयीन गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे प्रमूख प्रा. डॉ. निलेश सुलभेवार यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते. गजानन पाचकवडे, मधुकर जाधव, श्रीमती वनमाला लढी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©