यवतमाळ सामाजिक

“ड ” यादीत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ दया. – आकाश नडपेलवार

“ड ” यादीत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ दया. – आकाश नडपेलवार

तातडीने लाभ न दिल्यास आंदोलनाचा इशारा.

घाटंजी – शासन स्तरावरून राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजनेत अनेक निकष लावीत प्रत्येक गरजावंत लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ देण्यात येणारं असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी मागील काळात एका झालेल्या सर्वेत गट ठरवून अनेक गरजावंत लाभार्थ्यांचे नावं “ड” यादीत टाकण्यात येवून त्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचे तो लाभ तातडीने देण्यात यावा अन्यथा जन आंदोलन उभारू असा इशारा चिखलवर्धा येथिल सरपंच आकाश नडपेलवार यांनी दिला आहे. चिखलवर्धा, गोविंदपूर गौरथडा या गावासह घाटंजी तालुक्यातील अनेक लाभार्थी झालेल्या चुकीच्या सर्वेने प्रपत्र “ड” मध्ये टाकल्याने घरकुलच्या लाभा पासून वंचित आहे. तालुक्यांतील बहुतांश नागरिकांना रहायला घर नसून अनेकांचे तुटके, मोडके कुडा मातीचे घर असताना सुद्धा त्यांचें नावं प्रपत्र ड मध्ये नाव असल्याने त्यांना घरकुल चा लाभ मिळाला नसल्याचे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा अंत न पाहता प्रपत्रा ड ची यादी सुरू करुन घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी चिखलवर्धा येथिल सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते आकाश नडपेलवार यांनी केली असून या लाभार्थ्यांना तातडीने मदत न दिल्यास लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारू असा इशारा प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©