यवतमाळ सामाजिक

हातभट्टी दारू काडणाऱ्या वर लाडखेड पोलिसांची कारवाही

अन्सार खान लाडखेड प्रतिनिधी 

हातभट्टी दारू काडणाऱ्या वर लाडखेड पोलिसांची कारवाही

लाडखेड पोलिस्टेशन अंतर्गत येणाऱ्या इचोरी येथील शेत शिवरात आदित्य साहेबराव राठोड यांचे शेताजवळील नाल्या जवळ ज्ञानेश्वर सुधाकर गाडेकर वय 35 वर्ष, रा. ईचोरी शेत शिवारा मध्ये हा मोहामाचा चा साडवा तयार करून हातभट्टी दारु काढत असल्याची गोपनीय माहिती लाडखेड पुलिस स्टेशन ला मिळाली या वरुन पोलिस स्टेशन चे थानेदार स्वपनील निराळे सहकारी पोलिसान सोबत घटनास्थळी जाऊन झडती घेतली असता वरील आरोपी मिळून आला त्याचे ताब्यातील मोहमाच सडवा 310 लिटर प्लास्टिक ड्रम मध्ये 40 रू. प्रमाणे किंमत 12,400/- रू व गावठी हातभट्टी दारु 75 लिटर प्लास्टिक डबकित 125 रू प्रमाणे 9,375 रू. चा असा एकूण मुद्देमाल 21,775 /- रू. अवैधरित्या मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून आरोपी वर कलम 65(क)(ड)(फ) म. दा. कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाही लाडखेड पोलिस्टेशन चे ठानेदार स्वपिल निराळे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवलदार शालिक लडके,उमेश शर्मा,रणजीत गुरणुले,विट्ठल कोपनर यांनी पार पाडली.

Copyright ©