यवतमाळ सामाजिक

जगदंबा उर्फ लखमाई संस्थान पाथ्रड देवी येथे भव्य नवरात्र उत्सव 

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी.

जगदंबा उर्फ लखमाई संस्थान पाथ्रड देवी येथे भव्य नवरात्र उत्सव 

दारव्हा.. तालुक्यातील पाथ्रड देवी येथील संस्थानात नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला आहे. या उत्सवामुळे गावामध्ये उत्साह व धार्मिक वातावरण आहे. दररोज सकाळी पंचामृताने आईस अभिषेक घातला जातो.

नवरात्र उत्सवात घटस्थापना करून नऊ दिवस भजन-कीर्तन आदी कार्यक्रम पार पडतात. शेवटच्या दिवशी कुलस्वामिनी ग्रामदेवता असल्याने वारकऱ्यांच्या हरिपाठात गावांमधून भव्य | मिरवणूक काढली जाणार आहे. पर्यावरणाचा -हास अनं त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच दिसत आहेत. पण अश्याही परिस्थितीत यंदाच्या पावसाळ्यात गोकी प्रकल्पाच्या कुशीत निसर्ग विसावला आहे. आदीशक्ति स्वरूपाचे रुप असलेल्या पाथ्रड (देवी) तील जगदंबा उर्फ लखमाई मातेचे पौराणिक महत्त्व असलेला हा परिसर हिरव्या गर्द वनराईने नटला असुन या भागात पर्यटनास प्रचंड वाव असतांना पाहिजे तसा विकास झाला नाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. “पाण्याच्या पाठीवरती किती रेघोट्या नि रेषा पानावर लिहीली असते, पक्षाची बोलीभाषा, पानांची ओंजळ होता सावरतो थेंब दवाचा, की कुशीत या झाडाचा वाढतो वंश मेघांचा”. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील पाथ्रड (देवी) येथे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले जगदंबा उर्फ लखमाई मातेचं तिर्थक्षेत्र हे अतिशय प्राचिन असुन सम्राट अशोक कालीन मंदिराच्या गाभाऱ्यातील वरच्या घुमुटावर हत्ती, चित्ता, वाघ, सिहं, हे हिस्र प्राणी तसेच हातात तलवार घेऊन असलेले सैनिक यांचे कोरिव काम दिसुन येते, अशी माहिती ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितली आहे. तसेच देवीचा परिसरात प्रसन्न वाटते, मानसिक समाधान मिळते, आणि निसर्गरम्य परिसर पाहुन मन मोहुन गेल्याशिवाय राहणार नाही. पाथ्रड (देवी) चा परिसर यंदाच्या | पावसाळ्याने अधीकच बहरला. उंच उंच सागवानी हिरवीकच्च झाडे मनाला खिळवून ठेवते. चिकणी, आमशेत, उमरठा या मार्गे पाथ्रड (देवी) ला जातांना हे हिरवेगार दृश्य पाहुन संपुर्ण दिवस या परिसरातच घालवावा असं आपल्या | मनाला वाटतं. गोकी मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने सांडव्यावरून शुभ्र निळसर | पाणी नाना पाटेकरांच्या ” गिरो सालो गिरो, मगर उस झरणे की तराह” या डॉयलॉगची आठवन करुन देते. या गावातील प्रतेकालाचं “गाव माझे चिमुकले, जणु प्रेमळ घर हे घरट्यांनीच बांधले, ” पाऊल ठेवताच या गावामध्ये वाटे एखादे मुल जणू हळुच आईच्या कुशित शिरले, निसर्गरुपी आईच्या कुशीत पाथ्रड देवी आज मुला प्रमाणे विसावले आहे.” गावातील लोकांची एकमेकांप्रती असलेली आपुलकी इथेही आज दिसुन आली. गोकी | प्रकल्यातील पावसाळ्याच्या पाण्यामुळे जसा हा परिसर निसर्ग सौंदर्याने खुलतो. तसा तो उन्हाळ्यातही रहावा, म्हणुन शासन आणी प्रशासनाने या निसर्गसौंदर्य स्थळाला भेट देवुन त्यातील जिवंतपणा कायम राखावा. अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांच्या वतीने सातत्याने होत आहे. तरी या वषी भव्य यात्रेचे आयोजन करन्यात आले आहे, पाथ्रड देवी येथे यवतमाळ जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातीलही अनेक ठिकाणांवरुन प्रेक्षकवर्ग हजेरी लावतांना | दिसुन येतात.

Copyright ©