यवतमाळ सामाजिक

जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतगर्त

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व क्रीडा परिषद, यवतमाळ

यवतमाळ जिल्हा जय स्केटिंग क्लब

यांच्या सयुक्त विद्यामाने आज

दिनांक ११ .ऑक्टोंबर २३ रोजी. वीणा देवी दर्डा डे- बोर्डिंग स्कुल येथे जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये २५ ते ३० शाळेचा सहभाग होता या मध्ये जवळ पास १०० ते १२० मुले मुलीनंचा समावेश होता. ही स्पर्धा कॉड व ईनलाईन या स्केट प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धाचे वयोगट ११ वर्षा आतील , १४ वर्षा आतील, १७ वर्षा आतील, व १९ वर्षा आतील मुले मुली मध्ये झाल्या.

सदर कार्यक्रम चे अध्यक्ष – श्रीमती अनिता रासकर ( प्राचार्य – वीणदेवी दर्डा डे- बोर्डेग स्कूल यवतमाळ )

प्रमुख पाहुणे

श्रीमती सि. एस. लोखंडे ( क्रिडा अधिकारी यवतमाळ ) तसेच शाळेच्या क्रिडा शिक्षिका सौ. राधिका जैस्वाल

व जय स्केटिंग चे संस्थापक प्रविण दिघाडे हे होते .

तसेच यवतमाळ , वणी, पुसद , दिग्रस, आर्णी, महागाव , नेर , घांटजी , पांडकवडा , येथून क्रिडा शिक्षक , व प्रशिक्षक उपस्थीत होते

Copyright ©