यवतमाळ सामाजिक

डेकोरेशन स्पर्धा विविध पादार्थानी संपन्न

डेकोरेशन स्पर्धा विविध पादार्थानी संपन्न

स्व. राजकमलजी भारती कला,वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय येथे भरड धान्य विषयक डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

स्थानिक स्व, राजकमलजी भारती कला वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई भारती विज्ञान महाविद्यालय आर्णी येथे बी.ए. भाग २ गृह अर्थशास्त्र विषयातील अभ्यासक्रमानुसार डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक व नाविन्यपूर्ण स्वादिष्ट पाककृती बनवून आणल्या. यामध्ये बाजरीचे खजूर, बाजरीचे खारे शंकरपाळे, भगरीचे धिरडे, भगरीचे पकोडे,ज्वारीचा ढोकळा, ज्वारीची बर्फी, ज्वारीची मसाला वडी, ज्वारीचा चिवडा, बाजरीचा ढोकळा, बाजरीची खिचडी, नाचणीचा हलवा ,नाचणीचा ढोकळा इत्यादी पदार्थ विद्यार्थिनींनी बनविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.ए. पिस्तूलकर.उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ.प्रशांत आवते,डॉ.उमेश मोरे , डॉ.मनोज काकपुरे उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.ए.पिस्तुलकर यांनी भरड धान्याचे महत्त्व सांगताना, भरड धान्यास श्री असे देखील म्हटले जाते. देश स्तरातील बहुतेक शेतकरी खाण्यासाठी ही धान्य पिकवत असे. आकाराने बारीक असलेली बाजरी नाचणी,वरी,राळा, बार्ली,प्रोसो, राजगिरा , कोदो , कुटकी ही सर्व मायनर मिलेट्स किंवा बारीक धान्य म्हणून ओळखली जातात. असे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले. परीक्षकांनी वेगवेगळ्या डिशचे परीक्षण करून गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कु. कु.अंकिता गवळी , द्वितीय क्रमांक कु.पायल ऊईके, तृतीय क्रमांक कु. प्रीती पिलावंन तर उत्तेजनार्थ कु.पूनम रौवराळे,कु छकुली राठोड , कु. वैशाली साखरकर या विद्यार्थिनींनी प्राप्त केले अर्थशास्त्र विभागाद्वारे डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनामिका चावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.निकिता गवळी यांनी केले. सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. कांचन मडावी, प्रा. स्वाती भगत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Copyright ©