यवतमाळ राजकीय

उ बा ठा शिवसेनेच्या ‘होऊ द्या चर्चाला’ जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उ बा ठा शिवसेनेच्या ‘होऊ द्या चर्चाला’ जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गावनिहाय दौऱ्याला उपनेते वडले यांची उपस्थिती

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दि. ०५ ऑक्टोबर रोजी दिग्रस तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमातून विद्यमान केंद्र सरकारच्या योजनांचा भांडाफोड गावनिहाय दौरा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना (उबाठा) उपनेते लक्ष्मणराव वडले यांची उपस्थिती होती. दिग्रस तालुक्यातील हरसूल, आरंभी, कलगाव, या ग्रामीण भागासह दिग्रस शहरात सदर कार्यक्रम संपन्न झाला.

देशातील प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू, २ करोड नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देऊ, महागाई कमी करू, महिलांवरचे अत्याचार बंद करू, यांसह विविध स्वप्ने विद्यमान भाजपा सरकारने लोकांना दाखविले. प्रत्यक्षात मात्र हाती काहीच आले नाही. अशा योजनांचा भांडाफोड करण्यासाठी उबाठा शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रसंगी उपनेते वडले, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश किशोर राठोड यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकारला धारेवर धरले. खोट्या आश्वासनांचा खरपूस समाचार घेत त्यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कंत्राटी पद्धत, स्त्री अत्याचार आदी विषयाला हात घातला. हरसूल, आरंभी, कलगाव, दिग्रस शहर आदी गावांमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपनेते वडले, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश किशोर राठोड, महंत सुनिल महाराज, प्रशांत सुर्वे, रवीपाल महाराज, कल्पना दरवई, अंजली गिरी, सुनिता टाके, यादव गावंडे, यादव पवार, रमेश चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तरुण, महिला व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली.

बंजारा समाज एकनिष्ठतेचे सर्वोत्तम प्रतीक

संत सेवालाल महाराज आणि बंजारा समाजाला आपण जवळून अभ्यासले आहे. शिवाय समाजाचा एक घटक असल्याने गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात मुळीच नाही. बंजारे एकवेळ चटणी- भाकर खाऊन दिवस काढेल किंबहुना उपाशी राहतील, मात्र बेईमानी सिध्दांताला जवळही भटकू देणार नाही. एकंदरीत बंजारा समाज नैसर्गिकरित्या एकनिष्ठतेचे सर्वोत्तम प्रतीक आहे.

-किशोर राठोड सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश

Copyright ©